सिंधुदुर्गमध्ये आंबा काढणीला गती; पावसामुळे बागायतदारांमध्ये चिंता

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील आंबा काढणीला गती आली आहे. परंतु सतत पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे आंबा खराब होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्गमध्ये आंबा काढणीला गती; पावसामुळे बागायतदारांमध्ये चिंता Acceleration of mango harvesting in Sindhudurg; Anxiety among gardeners due to rains
सिंधुदुर्गमध्ये आंबा काढणीला गती; पावसामुळे बागायतदारांमध्ये चिंता Acceleration of mango harvesting in Sindhudurg; Anxiety among gardeners due to rains

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील आंबा काढणीला गती आली आहे. परंतु सतत पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे आंबा खराब होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

किनारपट्टीच्या देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यांतील काही भागात हापूस आंबा हंगामाला डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होते. बाजारपेठेत आंबा लवकर आंबा येण्यासाठी या भागातील काही शेतकरी बागांची विशेष काळजी घेतात. डिसेंबर महिन्यापासून आंबा येत असला तरी मुख्य हंगाम फेब्रुवारी महिन्यानंतरच सुरू होतो.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरीपर्यंत या भागातील आंबा हंगाम सुरू होतो. अखेरीस येणारा आंबा येथील बागायतदार कॅनिंगसाठी उपयोगात आणतात. परंतु पूर्वपट्ट्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातील आंबा हंगाम उशिराने सुरू होतो. सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यातील आंबा हंगाम १५ एप्रिलनंतर सुरू होतो, तर कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील आंबा हंगाम एप्रिल अखेरीस सुरुवात होतो.

यावर्षी पूर्वपट्ट्यातील आंबा हंगामाला १ मेपासून सुरुवात झाली. परंतु आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पूर्वमोसमी पावसाचा तडाखा या भागाला बसला. २७ एप्रिलपासून या पूर्वपट्ट्यात सातत्याने पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. या शिवाय वादळी वाऱ्यांचा तडाखा देखील या भागाला बसला. या वातावरणाची धास्ती बागायतदारांनी घेतली आहे. त्यामुळे गेल्या सात आठ दिवसांपासून आंबा बागायतदारांनी आंबा काढणीची गती वाढविली आहे. सततच्या पावसामुळे आंबा खराब होईल, अशी भीती बागायतदारांच्या मनात आहे. त्यामुळे झाडावर असलेला सर्व आंबा काढून घ्यावा, याची लगबग सध्या पूर्वपट्ट्यातील आंबा बागायतदारांमध्ये दिसून येत आहे.

पश्चिम पट्ट्याच्या तुलनेत पूर्वपट्ट्यात कमी प्रमाणात आंबा आहे. परंतु हा आंबा स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री होतो. कोरोनामुळे थेट विक्री करण्याचा प्रयत्न बागायतदारांकडून सुरू आहे. प्रति डझन २५० ते ३०० रुपयांप्रमाणे आंब्याची विक्री सुरू आहे. पावसाच्या धास्तीमुळे शेतकरी आंबा विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com