अचलपूर तालुक्यातील तीन कृषी केंद्रांवर कारवाई

खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने अचलपूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली.
 अचलपूर तालुक्यातील  तीन कृषी केंद्रांवर कारवाई
In Achalpur taluka Action on three agricultural centers

अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने अचलपूर तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. या तीनही कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने एका महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले आहे.  परतवाडा शहरातील सद्गुरू कृषी केंद्राचे संचालक शंतनू काकड, योगेश कृषी केंद्राचे संचालक श्याम अग्रवाल व आशीर्वाद अॕग्रो एजन्सीचे संचालक किशोर गावंडे यांच्या कृषी केंद्राची तपासणी अचलपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी रविकांत उईके यांनी केली होती. तपासणीदरम्यान खतसाठा व दर फलक दिसून आले नाही. नोंदवही अद्यावत नव्हती. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पावतीवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी नव्हती. खतांचा अहवाल नियमित सादर करण्यात आला नाही. खतविक्री परवान्यात स्रोतांचा समावेश न करणे, पॉस मशिनमधून प्रत्येकी खताची विक्री केल्याची नोंद नसणे अशा अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. संबंधित कृषी सेवा केंद्र संचालकांनीदेखील याबाबतची लेखी कबुली दिली. त्या आधारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या तीनही कृषी सेवा केंद्राचे खत विक्री परवाने एका महिन्याकरता निलंबित केले आहेत. 

कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. परिणामी, तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. या अहवालावरून संबंधित कृषी सेवा केंद्राचे खत विक्री परवाने एका महिन्याकरिता निलंबित करण्यात आले आहे. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्र संचालकांनी शासन निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.  -  रविकांत उईके,  तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, अचलपूर 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.