बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर कारवाई होणार : सुभाष देशमुख

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत जास्त जनावरे आढळून आलेल्या बीड जिल्ह्यातील १८ चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. २५) विधान परिषदेत दिली. 

राज्यातील चारा छावण्यांसंदर्भात काँग्रेसचे आमदार रामहरी रूपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नी चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांमध्ये शासकीय पथकाने केलेल्या तपासणीत १७ हजार जनावरे जास्त आढळून आली आहेत. या छावण्यांना केवळ नोटिसा दिल्या आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे केव्हा दाखल करणार, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच कोल्हारवाडी येथील मत्स्यगंधा सेवाभावी संस्थेच्या चारा छावणी तपासणीच्या वेळी संस्थाचालकाने शासकीय पथकातील महिला अधिकाऱ्यांशी अरेरावी केली. या छावणीचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. 

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी अधिक जनावरे आढळून आलेल्या सर्व चारा छावण्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या दुष्काळी दौऱ्यात त्यांनी भेट दिलेली हायटेक चारा छावणी लगेच बंद का पडली, सरकारचा हा केवळ देखावा असल्याचा टोलाही श्री. मुंडे यांनी लगावला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com