सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड. माने यांचे उपोषण

हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीतर्फे माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांनी गुरुवार (ता.२०) पासून सालेगाव येथे कयाधू नदीवर उभारलेल्या बंधाऱ्या नजीक बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
Add. Mane's fast in Salegaon for irrigation backlog
Add. Mane's fast in Salegaon for irrigation backlog

कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढावा. कळमनुरी तालुक्यातील नियोजित सापळी धरण रद्द करावे. कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणामध्ये वळविण्याचा निर्णय रद्द करावा, आदी मागण्यांसाठी हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीतर्फे माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांनी गुरुवार (ता.२०) पासून सालेगाव येथे कयाधू नदीवर उभारलेल्या बंधाऱ्या नजीक बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यात १४ गावामधील नागरिक पाठिंबा देत सहभागी झाले आहेत. 

कयाधू नदीवर उच्च पातळीचे बंधारे बांधावेत. खरबी येथून कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणामध्ये वळविण्याचा निर्णय रद्द करावा, आदी संदर्भात ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. अॅड. माने यांच्यासह डॉ. वसंतराव पतंगे, दिगंबरराव कदम, सदाशिवराव चौतमल, हरिभाऊ झाकलवाडे, गणेश गुट्टे, गजानन काळे, राम किसन ठाकूर, शेषराव पतंगे, किरण नावडे, दादाराव मुंडे, अवधूत निळकंठे, विद्याधर मगर, शिवाजीराव काळे, आनंदराव डाढाळे, बजरंग गुट्टे, नंदकिशोर तोष्णीवाल आदी उपोषणात सहभागी झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com