दिल्लीतील शेतकरी आंदोलन दलाल, राजकारण्यांचे : सदाभाऊ खोत

पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे. तो शेतकऱ्यांचा नसून तेथील बाजार समित्यांमधील दलाल आणि राजकारण्यांचा आहे.
Sadabhau Khot
Sadabhau Khot

नाशिक : पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे. तो शेतकऱ्यांचा नसून तेथील बाजार समित्यांमधील दलाल आणि राजकारण्यांचा आहे. त्यांनी हे आंदोलन उभे केले आहे, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.  श्री. खोत हे खासगी कामानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे, उपजिल्हाध्यक्ष डोंगर पगार, युवराज देवरे आदी यावेळी उपस्थित होते.  श्री. खोत म्हणाले, की या राज्यांमध्ये तांदूळ व गव्हाची खरेदी हमीभावाने होते. ती खरेदी ९० टक्के होते. यासाठी केंद्र पैसे राज्य सरकारला देते. हा पैसा राज्य सरकार बाजार समित्यांना देऊन त्यावर १३ टक्के बोनस देतो. दुसऱ्या बाजूला शेतमाल खरेदी व्यापाऱ्याच्या माध्यमातून होते. त्यामुळे एकदा खरेदी केलेल्या मालाची नोंद होऊन तो गोदामात जातो. पुढे त्यात गळती, नासाडी यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होतात. जसे महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या भोवती राजकारण आहे, तसे या राज्यात बाजार समित्यांच्या भोवती राजकारण फिरत आहे. म्हणून हे लुटीचे अड्डे बंद पडले, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीच्या पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्या तर आम्ही लुटायचं कुणाला? हा खरा कळीचा मुद्दा असल्याने हा रोष असल्याचे त्यांनी सांगितले.  खोत म्हणाले, की केंद्राने तीन कायदे केले आहेत. मात्र, त्याबाबत गैरसमज पसरवले जात आहे. यापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात नव्हते, आता ग्राह्य धरून त्यासाठी लवाद नेमला आहे.त्यामुळे बाजार समित्यांचेही अस्तित्व अबाधित राहणार आहेत. तर बाजार समितीच्या बाहेर विक्री शक्य आहे. मात्र, एक दुकान किती वर्षे चालवायचे, शेतकऱ्यांचा जन्म बाजार समित्यांमधील व्यापारी बांडगुळ पोसण्यासाठी झाला आहे का? यापूर्वी ७० वर्षे शेतकरी का सक्षम झाला नाही. असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. जगभरात व देशात इतर क्षेत्रात स्पर्धा आहे. मग शेतीत का नको असं मुद्दा त्यांनी बोलताना उपस्थित केला.  मुंबईत आज समर्थन आंदोलन केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने रविवारी (ता. ६) मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी अकरा वाजता आंदोलन होणार आहे. कृषी कायद्यांचे  सर्वांनी स्वागत करून या कायद्याच्या समर्थनार्थ सामील व्हावे, असे आवाहन पांडुरंग शिंदे यांनी केले आहे. यात शेतकरी महिला, युवक सामील होणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com