वसारी येथे ‘स्वाभिमानी’ने केली दगड पेरणी

पीककर्ज वाटपात मोठी दिरंगाई होत आहे. शेतकऱ्यांजवळ पेरणीसाठी पैसे नाहीत. कर्जमाफी जाहीर केली असली, तरी आजही अनेक शेतकरी त्यापासून वंचित आहेत. शासनाचे शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे दगड पेरणी आंदोलन केले आहे. आता तरी निदान यंत्रणा जाग्या होतील, अशी अपेक्षा आहे. - दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम.
`स्वाभिमानी`ने केली दगड पेरणी
`स्वाभिमानी`ने केली दगड पेरणी

वाशीम : खरीप हंगाम दारात आलेला असतानाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. दुष्काळी मदत मिळाली नसून, सन्मान योजनेचीही अनेकांना मदत झालेली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. २६) निषेधात्मक दगड पेरणी केली. जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी वसारी येथे हे आंदोलन केले.

वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी पाऊस झालेला असून, काही ठिकाणी पेरणीयोग्य स्थिती आहे. मात्र शेतकऱ्यांनी पैशांअभावी अद्यापही बियाणे, खतांची खरेदी केलेली नाही. बँकांकडून पीककर्ज वाटपात वेळखाऊपणा केला जात आहे. शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे . मात्र ना शासन मदत करीत आहे ना बँकांचे पाठबळ मिळत आहे. अशा स्थितीत हतबल असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीची चिंता लागलेली आहे. जिल्हयात दुष्काळी स्थिती होती. शेतीमालाही पुरेसा भाव मिळाला नाही. आता शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने व पेरणीसाठी त्याच्याजवळ बियाणे, खते नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसारी येथे अरुण लादे यांच्या शेतात दगड पेरणीचे हे निषेधात्मक आंदोलन केले.      

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com