एकात्मिक कृषी पणन योजना नव्या स्वरूपात

एकात्मिक कृषी पणन योजना नव्या स्वरूपात
एकात्मिक कृषी पणन योजना नव्या स्वरूपात

पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ मध्ये दुप्पट करण्यांतर्गत पणन सुविधांसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र एकात्मिक कृषी पणन योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये ३१ मार्च २०२० पर्यंत सहभागी होता येणार आहे. राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ही माहिती दिली. केवळ शेतीमालाच्या उत्पादन वाढीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार नसून, पणन, प्रक्रिया, मुल्यवर्धन, पूरक व्यवसायातून उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाने एकात्मिक कृषी पणन योजना आखली आहे. योजना ३१ मार्च २०२० पर्यंत राबविण्यात येणार असून, यामध्ये ग्रामीण आठवडी बाजार, साठवणूक सुविधा विकास, पणनविषयक पायाभूत सुविधा विकास करण्यात येणार आहे. 

या योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांबरोबर, शेतकरी उत्पादक कंपनी, बाजार समिती, सहकारी संस्था, शेतकरी गट, भागीदारी मालकी संस्था, कंपन्या, महामंडळे, बिगर सरकारी संस्था, स्वयंसाह्यता गट, यांच्या माध्यमातून शेतकरी ग्राहक बाजार, ग्रामीण आठवडी बाजार, सामूहिक सुविधा केंद्रांची उभारणी करणे, साठवणूक सुविधांची (गोदाम व सायलो) उभारणी आदी घटकांना बँक कर्जाशी निगडित अनुदान देण्यात येणार आहे. 

यामध्ये शेतकरी ग्राहक बाजार, व ग्रामीण आठवडी बाजार उभारणीसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या, पंचायत राज संस्था, महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमातीतील उद्योजक किंवा त्यांच्या सहकारी संस्था यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या ३३.३३ टक्के व जास्तीत जास्त ३० लाख रुपये व इतरांना पात्र प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के व जास्तीत जास्त २५ लाख रुपये अनुदान प्राप्त होऊ शकणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्थांना सामूहिक सुविधा केंद्रांची उभारणी करण्याकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ३३.३३ टक्के व जास्तीत जास्त रु. ३० लाख अनुदान उपलब्ध होणार आहे.   

अधिक माहितीसाठी

  • सहायक कृषी पणन सल्लागार, मुंबई 
  • ०२२/२२०६८०१/२२०३२६९९ 
  • Email–dmiromah@nic.in
  • अजित हेशी, फलोत्पादन विकास अधिकारी (प्रकल्प विभाग) - ९८५००११४७०
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com