शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्या

औरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील सात बाजार समित्यांनी २०२१-२२ च्या हंगामात शेतीमाल तारण योजनेत सहभाग नोंदविला आहे. जवळपास ८६१२ क्विंटल शेतीमाल या समित्यांनी या योजनेच्या माध्यमातून तारण ठेवला आहे.
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्या
In agricultural commodity mortgage scheme Seven market committees

औरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील सात बाजार समित्यांनी २०२१-२२ च्या हंगामात शेतीमाल तारण योजनेत सहभाग नोंदविला आहे. जवळपास ८६१२ क्विंटल शेतीमाल या समित्यांनी या योजनेच्या माध्यमातून तारण ठेवला आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत जवळपास ३६ बाजार समित्या कार्यरत आहेत. परभणीतील परभणी, पाथरी, मानवत, जिंतूर व सेलू, हिंगोलीतील वसमत, तर जालन्यातील मंठा बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे. २१३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपला शेतीमाल तारण ठेवला. 

परभणी बाजार समितीने स्वनिधीतून तारण योजना राबविली आहे. त्यासाठी बाजार समित्यांना २ कोटी ५२ लाख ४ हजार ५६४ रुपये अदा केले.  सात बाजार समित्यांनी १७ जानेवारी अखेरपर्यंत ८६१२ क्‍विंटल ४८ किलो शेतीमाल तारण ठेवला आहे. यामध्ये सोयाबीन, हरभरा, हळद, गहू आदींचा समावेश आहे. परभणी बाजार समितीकडे २७ शेतकऱ्यांनी ११२३ क्‍विंटल १८ किलो सोयाबीन, ३ शेतकऱ्यांनी ७२ क्‍विंटल ८५ किलो हरभरा, एका शेतकऱ्याने १२७ क्‍विंटल ६० किलो हळद तारण ठेवली. 

पाथरी बाजार समितीकडे ११७ शेतकऱ्यांनी ४७६५ क्‍विंटल ३० किलो सोयाबीन, मानवत बाजार समितीकडे एका शेतकऱ्याने ९ क्‍विंटल ६० किलो गहू, ३३ शेतकऱ्यांनी १२९२ क्‍विंटल सोयाबीन, ३ शेतकऱ्यांनी ४५ क्‍विंटल हरभरा, एका शेतकऱ्याने २१ क्‍विंटल हळद, जिंतूर बाजार समितीकडे ६ शेतकऱ्यांनी १६९ क्‍विंटल ८५ किलो सोयाबीन, सेलू बाजार समितीकडे १८ शेतकऱ्यांनी ८७४ क्‍विंटल ५० किलो सोयाबीन वसमत बाजार समितीकडे एका शेतकऱ्याने ५५ क्‍विंटल सोयाबीन तर, मंठा बाजार समितीकडे २ शेतकऱ्यांनी ५६ क्‍विंटल ६० किलो सोयाबीन तारण ठेवला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com