वणी तालुक्‍यात कृषीपंप थकबाकी ३० कोटींवर 

वणी तालुक्‍यात कृषीपंपाच्या थकबाकीचा आकडा ३० कोटी ७९ लाख ७३ हजार २७३ रुपयांवर पोचला आहे. ४ हजार ६५६ शेतकऱ्यांनी ही रक्‍कम थकविलीआहे.
 वणी तालुक्‍यात कृषीपंप थकबाकी ३० कोटींवर Agricultural pump arrears in Wani taluka over 30 crores
वणी तालुक्‍यात कृषीपंप थकबाकी ३० कोटींवर Agricultural pump arrears in Wani taluka over 30 crores

यवतमाळ : वणी तालुक्‍यात कृषीपंपाच्या थकबाकीचा आकडा ३० कोटी ७९ लाख ७३ हजार २७३ रुपयांवर पोचला आहे. ४ हजार ६५६ शेतकऱ्यांनी ही रक्‍कम थकविली असून, त्यांच्याकडून या रक्‍कमेच्या वसुलीसाठी महावितरणकडून आता वेगवेगळ्या सवलती देण्याचा पर्याय अवलंबला जात आहे. 

वणी तालुक्‍यात कृषीपंपधारक शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ६८४ एवढी आहे. त्यापैकी केवळ २८ शेतकऱ्यांनीच नियमितपणे वीजबिलाचा भरणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित शेतकऱ्यांनी वीज जोडणी घेतलेल्या महिन्यापासूनच वीजबिलाचा भरणा केला नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीकडून वीजबिलच आतापर्यंत मिळाले नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

वीज कंपनीने हा आरोप फेटाळताना वीज जोडणी घेतेवेळी शेतकऱ्यांकडून शेताचा पत्ता दिलेला असतो. वीज बिल घेऊन गेल्यावर त्या ठिकाणी बिल घेण्यासाठी कोणीच उपलब्ध नसते. त्यामुळे ते बील परत येते, असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे आपला मोबाइल क्रमांकही दिलेला नाही.

मोबाईल क्रमांक दिल्यास त्यावर बील पाठविणे शक्‍य होईल. परिणामी शेतकऱ्यांनी आपला मोबाइल क्रमांक वीज वितरण कंपनीकडे द्यावा, असे आवाहन कंपनीने केले आहे. दुसरीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या वाढण्यामागे गेल्या काही वर्षांतील अनिश्‍चित पाऊसमान आणि त्यामुळे प्रभावित झालेली उत्पादकता हे देखील कारण सांगितले जाते.  महावितरणची थकबाकीदारांसाठी योजना  थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकऱ्यांठी वीज वितरण कंपनीने योजना तयार केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबर २०१५च्या अगोदरचे विलंब शुल्क आणि व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५नंतरचे विलंब शुल्क माफ करून सुधारित व्याज आकारण्यात येणार आहे. यासाठी मार्च २०२४ पर्यंत संबंधित शेतकऱ्यांना नियमितपणे वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com