कृषी विजबिले अवास्तव

ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग वाढली तर दुसरीकडे महावितरणने थकीत वीजबिल वसुलीचा धडाका लावल्याने वातावरण ढवळून निघत आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कापण्यात आल्याने रब्बीच्या तोंडावर संकट उभे ठाकले आहे.
Agricultural pump electricity bill unreal
Agricultural pump electricity bill unreal

अकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग वाढली तर दुसरीकडे महावितरणने थकीत वीजबिल वसुलीचा धडाका लावल्याने वातावरण ढवळून निघत आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कापण्यात आल्याने रब्बीच्या तोंडावर संकट उभे ठाकले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीज कंपनी, शासनाच्या धोरणांना जबाबदार ठरवले आहे. होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

वीज प्रश्नाबाबत जानेफळ येथील शेतकरी रमेश निकस म्हणाले, दिवसभरात शेतकऱ्याला आठ तास वीज दिली जाते. त्यातही काही तास विद्युत दुरुस्तीसाठी पुरवठा बंद असतो. म्हणजे शेतकऱ्याला जेमतेम चार पाच तास वीज मिळते. प्रत्यक्षात ७० ते ८० टक्के शेतकरी नोव्हेंबर ते जानेवारी फक्त तीन महिने विजेचा वापर करतात. इतर काळामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे वीजपंप बंद असतात. शेतकऱ्यांच्या नावावर ७५ हजार कोटी थकीत बिल दाखविण्यात येत आहेत. प्रत्यक्षात वर्षभराची बिले लावून ही थकबाकी दाखविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी चार महिने वीज वापरली. त्याचे प्रत्यक्षात जर बिल दिले तर शेतकरी बिल भरू शकतात. परंतु न वापरलेले बिल माथी मारण्यात येत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पंपावर मीटर बसून वीजबिल आकारले तर शेतकऱ्याला वर्षाअखेर दोन तीन हजारांपेक्षा जास्त बिल देणे कठीण नाही.

प्रत्यक्षात वर्षभराची बिले लावून ही थकबाकी दाखविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी चार महिने वीज वापरली. त्याचे प्रत्यक्षात जर बिल दिले तर आजही शेतकरी बिल भरू शकतात परंतु न वापरलेले विजेचे बिल शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. त्यामुळे हा सर्व गोंधळ असून याचा सर्व राजकीय पक्ष फायदा घेत आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पंपावर मीटर बसून वीजबिल आकारले तर शेतकऱ्याला वर्षाअखेर दोन तीन हजारांपेक्षा जास्त बिल देणे कठीण नाही. सर्व शेतकऱ्यांना मीटर देऊन बिल आकारणी केली तर हा गुंता लवकर सुटेल आणि शेतकऱ्यांच्या नावावर विजेचा जो भ्रष्टाचार चालतो तो बंद होईल.

भोसा येथील शेतकरी प्रभाकर खुरद म्हणाले, माझ्या गावातील माझ्यासह बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने प्रत्येकी एक ते दोन लाखापर्यंत खर्च करून रोहित्र घेतले. त्यावेळेस माहिती मिळाली की झालेल्या खर्च वीज बिलामधून कमी करून मिळेल आणि आता वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जात आहेत. एव्हढा खर्च करून शेतकरी वीज आपल्या शेतात आणू शकतो तर वीजबिल भरणे त्यांच्यासाठी अवघड नाही. परंतु अश्वशक्तीनुसार योग्य ती बिले शेतकऱ्यांना दिली पाहिजेत आणि दिवसा कमीत कमी १२ तास वीज दिली पाहिजे. तसेच प्रत्येक रोहित्रावर अधिकृत जोडण्या पाचची क्षमता असताना अनधिकृतपणे दहा-दहा जोडण्या दिल्या जातात. याकडे कोणताही राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे कुठला पक्ष असेल तर तो आहे फक्त विरोधी पक्ष असतो. ही खरी कृषिप्रधान देशाची शोकांतिका आहे.

वीजबिले रिडिंग न घेता दिली   वायरमन लोकांचे निरोप येत असून शेतातील बिल जर भरले नाही तर वीज पुरवठा बंद करण्याबाबत सांगत आहे. पण वीजबिल हे मीटर रीडिंग प्रमाणे नसून अवाजवी आहे. माझ्या शेतात नवीन छोटे रोहित्र बसवलेले असून वर्षातून फक्त तीन महिनेच माझ्या विहिरीला पाणी असते. इतर दिवस मोटर पूर्णपणे बंद असते तरीही मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिल वर्षाला नऊ हजार दिले जाते. १० एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला जेव्हढे बिल असते तितकेच दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला पण दिले जाते. यात बदल झाला पाहिजे, असे आडविहिर गावातील शेतकरी अमोल खर्चे म्हणाले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com