शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे! : आदिनाथ चव्हाण

पुणे :शेतकरी समृद्ध झाला तरच देश श्रीमंत होईल, असे सांगतानाच ढाल, तलवारीने लढाईचे दिवस गेले असून, शेतीच्या उन्नतीसाठी आता ज्ञानाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले.
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे! : आदिनाथ चव्हाण
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे! : आदिनाथ चव्हाण

पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला सध्या सन्मान असल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांचे विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात शोषण होते आहे. पण शेतकरी समृद्ध झाला तरच देश श्रीमंत होईल, असे सांगतानाच ढाल, तलवारीने लढाईचे दिवस गेले असून, शेतीच्या उन्नतीसाठी आता ज्ञानाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले. अॅग्रोवन मार्टच्या मार्ट पार्टनरसाठी २२  ते २४ फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण बोलत होते. तीन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दीपक फर्टीलायझरचे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, एबी व्हिस्टा कंपनीचे दक्षिण आशियाचे संचालक डॉ. दिनेश भोसले, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्यासह अॅग्रोवन ॲग्रीटेक इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश शेजवळ आदींनी मार्गदर्शन केले.        माणसं जोडा, जग जोडले जाईल अॅग्रोवन मार्ट या प्रकल्पाचा आवाका आणि विस्तार खूप मोठा आहे. या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या प्रत्येक घटकाबरोबरच मार्ट पार्टनरची जबाबदारीही मोठी आहे. अॅग्रोवन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अॅग्रोवन मार्टमुळे अधिक दृढ होईल असा विश्वास वाटतो, असे मत ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी मांडले. माणसं जोडत जा, जग तुमच्याशी आपोआप जोडले जाईल, असा सल्लाही त्यांनी दिला. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणा, सचोटी आणि प्रेम या गोष्टींची आवश्यकता असते. त्याचबरोबर हवे मनाचे व्यवस्थापन. व्यवसाय करताना खचून न जाता, संयम, संवेदनशीलतेने काम करायला हवे. -    विजयराव पाटील,  सहयोगी उपाध्यक्ष, दीपक फर्टीलायझर आपण सर्व जण व्यवसायासाठी एकत्र आलो असलो तरी आपली वाटचाल सामाजिक बांधिलकी आणि समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच असायला पाहिजे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून, त्याला थेट फायदा मिळावा हे आपले उद्दीष्ट आहे. शेतीशी निगडीत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व घटकांचे योगदान महत्वाचे आहे. -    नीलेश शेजवळ, सीईओ, अॅग्रोवन ॲग्रीटेक इंडस्ट्रीज     शेती बळकट झाल्यास सर्वच घटक समृद्ध होतील. शेती आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी अॅग्रोवनने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. -    डॉ. राजाराम देशमुख,  माजी कुलगुरू, राहुरी कृषी विद्यापीठ    देशात अनेक जण लखपती -करोडपती आहेत, मात्र यात शेतकरी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी लखपती होण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे. -    डॉ. दिनेश भोसले, दक्षिण आशियाचे संचालक, एबी व्हिस्टा कंपनी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com