सहकारी संस्थांना शिस्त लावण्यासाठी दोन समित्या

विकास संस्था
विकास संस्था

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या बेशिस्तीला लगाम लावण्यात येणार आहे. यासाठी बेशिस्त संस्थांचे मूल्यमापन करून उपाययाेजना सुचविण्यासाठी दाेन स्वतंत्र समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

सहकारी कृषी प्रक्रिया व पणन संस्थांसाठी पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांच्या अध्यक्षतेखाली, तर सहकारी ग्राहक संस्था आणि संघासाठी ग्राहक महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

राज्यात सुमारे २ लाख सहकारी संस्था कार्यरत असून, सुमारे साडेपाच काेटी सभासद संस्थाशी निगडित आहेत. या विविध संस्थांमधील अनेक संस्था सहकार कायदा, शासनाच्या धाेरणात्मक निर्णयांचे उल्लंघन करून कामकाज करत आहेत. यामुळे अनेक संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

यासाठी या विविध संस्थांचा अभ्यास, मूल्यमापन करून त्यांच्यामध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी उपाययाेजना करण्यात येणार आहे. यासाठी दाेन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

सहकार कृषी व पणन प्रक्रिया संस्थांसाठी पणन संचालक डॉ. अानंद जाेगदंड यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांचे सदस्य सचिव काेल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे आहेत. तर सहकारी ग्राहक संस्था, संघाच्या अभ्यासासाठी ग्राहक महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, त्यांचे सचिव जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) बिभीषण लवांड आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com