अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसे

अकोला जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र याचा शासनाच्या पैसेवारीही काहीही परिणाम दिसून आलेला नाही. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५३ पैसे जाहीर केली आहे.
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसे
प्रातिनिधिक छायाचित्र

अकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र याचा शासनाच्या पैसेवारीही काहीही परिणाम दिसून आलेला नाही. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५३ पैसे जाहीर केली आहे. ९९० गावांची ही पैसेवारी काढण्यात आली आहे. पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील पीकपरिस्थिती उत्तम असल्याची एकप्रकारे मोहर लागली आहे.  दरम्यान, अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून रूढ झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते.  दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीकपरिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीकपरिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे. जिल्ह्यात ९९० गावे खरीप पिकांची लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या या गावांमधील सुधारित नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५३ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

...असे झाले होते नुकसान जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसामुळे दीड लाख हेक्टरर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे ९ हजार ३८.०७ हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेली होती. हे नुकसान २१ ते २४ जुलै आणि ६ ते ९ सप्टेंबर या दोन टप्प्यांतील अतिवृष्टीमुळे झाले आहे. याव्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. असे असल्यानंतर सुद्धा आधी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक, तर आता सुधारित नजरअंदाज पैसेवारीसुद्धा ५३ पैसे जाहीर करण्यात आल्यामुळे अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानीसह सुलतानी संकटसुद्धा असल्याचे दिसून येत आहे. तालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी

  • अकोला  :  ५२
  • अकोट  :  ५३
  • तेल्हारा  :  ५२
  • बाळापूर  :  ५२
  • पातूर  :  ५४
  • मूर्तिजापूर  :  ५३
  • बार्शीटाकळी  :  ५४
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.