‘पेनटाकळी’बाधित गावातील नागरिकांना भूखंडांचे वाटप

जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधित असलेल्या घानमोड, मानमोड गावातीलनागरिकांना भूखंडाचे वाटप करण्यात आले.
 ‘पेनटाकळी’बाधित गावातील  नागरिकांना भूखंडांचे वाटप
Allotment of plots to the citizens of Pentakali affected village

बुलडाणा ः जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधित असलेल्या घानमोड, मानमोड गावातील बाधित नागरिकांना भूखंडाचे वाटप आमदार श्‍वेता महाले, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले. सुमारे ११२ प्लॉटचे या वेळी वितरण केल्या गेले.  पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित असलेल्या गावातील नागरिकांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण आमदार महाले यांच्या उपस्थितीत सोडविण्यात आले. बाधितांना भूखंड वाटप केले जात असून येत्या काळात नागरी सुविधा पुरविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. नागरिकांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता ग्रामस्थांना पुनर्वसित जागेवरील प्लॉटचे वाटप करून केल्या गेली. दरम्यान येत्या मार्चपासून नागरी सुविधांची कामे केली जातील, असेही त्या म्हणाल्या. प्रातिनिधिक स्वरूपात शोभा दादाराव कुळकर्णी यांना लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले. माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अनिल माचेवाड, पेनटाकळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिल चोपडे, उपकार्यकारी अभियंता अमर पाटील, पंचायत समिती सभापती सिंधू तायडे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ व इतर उपस्थित होते.  या वेळी घानमोड, मानमोड गावात प्रकल्प बाधितांच्या संमतीने तसेच लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूखंड वाटपासाठी चिठ्‍ठ्या काढण्यात आल्या. सध्या ज्या भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे त्याच बाधितांना ते भूखंड देण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शवली.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.