मृदा आरोग्यपत्रिकेचे कृषी विभागामार्फत वाटप

मृदा आरोग्यपत्रिकेचे कृषी विभागामार्फत वाटप
मृदा आरोग्यपत्रिकेचे कृषी विभागामार्फत वाटप

भराडी, जि. औरंगाबाद ः महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सिल्लोड तालुका कृषी विभागामार्फत सावखेडा बुद्रुक (ता. सिल्लोड) येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिकावाटप व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण मार्गदर्शन कार्यक्रम सोमवारी (ता. १) पार पडला. या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा ‘सकाळ- ॲग्रोवन खत व्यवस्थापन विशेषांका’चे तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. खरीप पेरणीच्या तोंडावर आलेल्या या विशेषांकाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. 

या वेळी तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी म्हणाले, ‘‘सिल्लोड तालुक्‍यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. ही अळी धावडा (ता. सिल्लोड) शिवारात आढळून आलेली आहे. कृषी विभागामार्फत सुचविण्यात येणारे उपाय योजनांचा उपयोग करून नुकसान कमी करायचे आहे.’’

या वेळी खत व्यवस्थापन कसे करावे किती प्रमाणात घ्यावे. याबाबत कृषी सहायक अंबादास कस्तुरकर यांनी मार्गदर्शन केले. मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणाबाबत कृषी सहायक गणेश फुसे, दीपक देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सरदार गोंगे, सदाशिव गोरे, दौलतराव गोंगे, बाळासाहेब गोरे, जितेंद्र तांबे, संजय चिकटे, बाळासाहेब गोंगे, राजू गोंगे, पंडित राकडे, नाशिकराव शेळके, खुशालराव सूर्यवंशी, अशोक काथार, विजय गोंगे, शिवाजी गोरे. अग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुनील दाभाडे, शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com