शेतकऱ्यांना हर्बल तंबाखू लागवडीची परवानगी द्या

परतूर, जि. जालना : शेतकऱ्‍यांना शासनाने हर्बल तंबाखू (गांजा) लागवड करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष गजानन राजबिंडे यांनी सोमवारी (ता. ३१ जानेवारी) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
Allow farmers to grow herbal tobacco
Allow farmers to grow herbal tobacco

परतूर, जि. जालना : शेतकऱ्‍यांना शासनाने हर्बल तंबाखू (गांजा) लागवड करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष गजानन राजबिंडे यांनी सोमवारी (ता. ३१ जानेवारी) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनानुसार, निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. अतिवृष्टीने शेतातील पिके मातीमोल झाली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास प्रतिवर्षी हिसकावून घेतला जात आहे. शेतकरी नुकसानीने चिंतातूर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  शेतकऱ्यांना प्रतिगुंठा शंभर रुपयांची तुटपुंजी मदत घोषित केली. परंतु या मधून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. महसूल मिळावा म्हणून केवळ ४५ दिवसांत सर्वसामान्य जनतेचा विचार न करता मद्यविक्री व्यावसायिकांना परवानगी देऊन कहर केला. 

अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी किमान हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देणे अपेक्षित होते. सरकारने तुटपुंजी मदत घोषित करून एकप्रकारे शेतकऱ्यांच्या परिस्थितीची चेष्टाच केली. सावकारी कर्ज, कोरोनाचे संकट, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, या मुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्यापेक्षा शेतकऱ्यांना सुद्धा हर्बल तंबाखूची (गांजा) शेती करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे. ]

निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष गजानन राजबिंडे, अशोक बाहेकर, शंकर भाडवलंकर, सचिन खरात, रामभाऊ पाजगे, भारत काळे, गजानन शेडगे, कैलाश डोबे, संतोष खराबे, अंकुश नळगे, निवुती मोरे, हनुमान चव्हाण, माउली बाहेकर, राहुल बोबडे, धीरज रकताटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com