अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्राला `आयसीएआर`चा राष्ट्रीय पुरस्कार

अंबाजोगाई, जि. बीड : तालुक्यातील डिघोळअंबा येथील कृषी विज्ञान केंद्रास भारतीय कृषी संशोधन परिषदेचा (आयसीएआर) २०१९ साठीचा पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.
kvk ambejogai
kvk ambejogai

अंबाजोगाई, जि. बीड : तालुक्यातील डिघोळअंबा येथील कृषी विज्ञान केंद्रास भारतीय कृषी संशोधन परिषदेचा (आयसीएआर) २०१९ साठीचा पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी (ता.१६) नवी दिल्लीत ‘आयसीएआर’चा ९२ वा स्थापनादिन सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री डॉ. नरेंद्रसिंह तोमर यांनी ही घोषणा केली.  येथील कृषी विज्ञान केंद्राचे उत्कृष्ट कार्य लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१९ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे दिला जाणारा राष्ट्रीय कृषी विज्ञान प्रोत्साहन पुरस्कार जाहीर केला आहे. देशातील १४ कृषी विज्ञान केंद्रांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये अंबाजोगाई परिसरातील डिघोळअंबा कृषी विज्ञान केंद्राचा समावेश आहे. केंद्राने जिल्हाभरात राबविलेल्या पीक उत्पादन, फळबाग लागवड, जलसंधारण, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, महिला शेतकरी सक्षमीकरण, गटशेती, पशुधन विकास आदी कार्याची दखल घेऊन या केंद्राला पुरस्कार जाहीर झाला. प्रतिनिधी... कृषी विज्ञान केंद्राने मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या सहभागातून शेतांवर केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार केंद्राला जाहीर झाला आहे.   जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कष्टाला हा पुरस्कार समर्पित करीत आहोत.  - डॉ. सौरभ शर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र,डिघोळअंबा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com