राज्यभरातील बाजार समिती कर्मचारी संपावर

बाजार समिती कर्मचारी आंदोलन
बाजार समिती कर्मचारी आंदोलन

यवतमाळ : हंगामी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समित्यांनी गुरुवारी (ता. २८) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने शेतकरी, शेतीमालाने गजबजलेले आवार ओस पडले असून, बाजार समित्या बंद आहेत.  बाजार समित्या तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत तोडगा काढण्याचा अल्टिमेटम कर्मचारी संघटनेनेन दिला होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतहरी तोडगा काढण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे गुरुवार (ता. २८) पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी संपावर गेले आहे. संपात कर्मचाऱ्यांपासून तर शिपायापर्यंत सर्वांचा सहभाग आहे. अनेक कर्मचारी आंदोलनासाठी मुबंईत दाखल झाले आहे. तर ज्यांचे जाणे झाले नाही. त्यांनीही कामकाजावर बहिष्कार आहे. तूर, हरभरा बाजार समित्यामध्ये येत असतानाच झालेल्या संपाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजार समित्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच बाजार समित्यामध्ये नोटीस लावून शेतकऱ्यांनी माल आणू नये, अशी विनंतीक केली होती.  त्यामुळे बाजार समितीमधील मालाची आवक घटली होती. गुरुवारी पहाटेपासून कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बाजार समितीमधील यार्ड रिकामे होते. यवतमाळ बाजार समिती एरवी शेतकरी आणि शेतीमालाने गजबजलेली असते, संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे शेतकरी आले नसल्याने व्यापारीही नव्हते. परिणामी आज एकही व्यवहार बाजार समित्यांच्या यार्डात झालेला नाही. जिल्ह्यात बाजार समितीमध्ये १९० कर्मचारी आहेत त्यातील तब्बल १७५ कर्मचारी संपात सहभागी झाले होते.

उमरखेड बाजार समिती सुरू बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बंद पुकारला आहे. बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी झाल्या. उमरखेड बाजार समिती बंदमध्ये सहभागी नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात एकमेव बाजार समितीत व्यवहार सुरू होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com