बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज करा

नारी शक्ती राष्ट्रीयपुरस्काराकरिता ३० जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज करा
Apply for Nari Shakti Award by January 30

बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्यच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना महिलादिनी ८ मार्चला नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराकरिता ३० जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.  या पुरस्कासाठी एक जुलै २०२१ रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान २५ वर्षे पूर्ण केले आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही. तसेच ज्या संस्था, गट, संघटनांनी किमान पाच वर्षे संबंधित क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.  कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य महिला सक्षमीकरणाचा व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना अनुभव असावा. राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचूकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.  अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाइनद्वारे केंद्र शासनाचे www.awards.gov.in या वेबसाइटवर भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.