‘‘महाडीबीटी’अंतर्गत योजनांसाठी अर्ज करावेत’

नांदेड : ‘‘विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
"Apply for schemes under MahaDBT"
"Apply for schemes under MahaDBT"

नांदेड : ‘‘कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यात जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत १९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. मागील काही वर्षाच्या तुलनेत अर्जाची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. विविध योजनांसाठी शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.  

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते लाभ मिळेपर्यंत संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज दाखल करताना कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. एकावेळी लॉगीन केल्यानंतर वेगवेगळ्या बाबींसाठी अर्ज करता येतात.

अर्जासाठी केवळ २३ रुपये ६० पैसे शुल्क आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी संख्या पाहता अर्जाचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १९ हजार अर्ज दाखल झाले. सर्वाधिक साडेदहा हजार अर्ज सिंचन सुविधेसंदर्भातील असल्याची माहिती तंत्र अधिकारी (विस्तार) वैभव लिंगे यांनी दिली.

बाबनिहाय अर्ज संख्या

बैल चलित अवजारे - ९१८, पॉवर टिलर - १,२५३, कृषी अवजारे बॅंक - ६३, ट्रॅक्टर - ६,०८१, टॅक्टर चलित अवजारे - ७,७६१, विशेष कृषी यंत्र - १५३, प्रक्रिया उद्योग - ४९५, ड्रिप इरिगेशन - ३,४४९, वैयक्तीक शेततळे - ३०८, पाइप - १,६८२, पंपसेट - १,१५५, स्प्रींकलर इरिगेशन ४,०४६.  ज्या शेतकऱ्यांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला नाही, त्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज भरावे.  - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com