सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी

सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश असलेल्या २ कोटी १९ लाख ७ हजार ५०० रुपयांच्या आराखड्यास पशुसंवर्धन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी
Approval of Rs. 2.19 crore plan for animal husbandry in Sindhudurg

सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश असलेल्या २ कोटी १९ लाख ७ हजार ५०० रुपयांच्या आराखड्यास पशुसंवर्धन समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या योजना राबविण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची सभा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, समिती सदस्य मनस्वी घारे, रवी पाळेकर, स्वरूपा विखाळे, रोहिणी गावडे, अनुप्रीती खोचरे, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभागामार्फत विविध १६ योजनांसाठी २ कोटी १९ लाख ७ हजार ५०० रुपयांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमोपचार केंद्राच्या दुरुस्तीसाठी २० लाख, साथीचे रोग अत्यावश्यक औषध खरेदीसाठी १५ लाख, पशुपक्षी प्रदर्शन व प्रचारासाठी ३५ लाख, खोडा पुरविणे २ लाख , शेळीगट वितरणासाठी १६ लाख, पशुवैद्यकीय दवाखान्यांना हत्यारे, उपकरणे, फर्निचर पुरविणे ५ लाख रुपये, पशुवैद्यकीय दवाखान्यांना क्षारमिश्रण जीवनसत्त्व व आवश्यक औषधे पुरविणे २० लाख रुपये, अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यासाठी ५० लाख, पशुवैद्यक संस्थांचे बळकटीकरणासाठी ५ लाख, फॅट टेस्टिंग मशिन पुरवठा करणे २ लाख रुपये, कडबाकुट्टी मशीनचा पुरवठा करणे ४ लाख रुपये, महिला सबलीकरणासाठी ९० टक्के अनुदानावर सुधारित जातीची एकदिवसीय ५० कुक्कुट पिलांचा गट व पशुखाद्याचा पुरवठा करणे ९ लाख रुपये, अंड्यावरील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी ३ लाख रुपये, महिला सबलीकरणासाठी ७५ टक्के अनुदानावर शेळीगट पुरविणे १६ लाख, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी ७ हजार ५००, सुधारित कोबड्यांच्या वितरणासाठी १७ लाख अशी तरतूद २०२२-२३ च्या आराखड्यात करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.