अर्जुनी मोरगावात दोन हजार रुपयांना एक ट्रॉली शेणखत

अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया ःपशुधनात होणाऱ्या घटीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत दीड हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.
in Arjuni Morgaon A trolley of manure for Rs  Two thousand
in Arjuni Morgaon A trolley of manure for Rs Two thousand

 अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया  ः रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरत चालली आहे. त्यामुळे जमिनीची पोत सुधारावी, यासाठी शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे वळले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत दीड हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारते. नुकत्याच पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून शेतजमिनीत शेणखताचे महत्त्व कृषी विभागाकडून अधोरेखित झाले आहे.

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये तशी जनजागृती करण्यात येत आहे. गाई, म्हशी, शेळी यांचे शेण व मलमूत्र, तसेच गोठ्यातील इतर केरकचरा आदी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या एका ट्रॉलीचे दर दीड ते दोन हजार रुपये आहेत. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे पुन्हा एकदा शेणखताची मागणी वाढली आहे. शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पलाश असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com