औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड : देसाई

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासाकामांद्वारे घोडदौड सुरू आहे. राज्यात जागतिक बँकेचा प्रकल्प असलेल्या ‘पोकरा’च्या अंमलबजावणीत सुरवातीपासूनच औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड : देसाई
Of Aurangabad district Horse racing in development work

औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध विकासाकामांद्वारे घोडदौड सुरू आहे. राज्यात जागतिक बँकेचा प्रकल्प असलेल्या ‘पोकरा’च्या अंमलबजावणीत सुरवातीपासूनच औरंगाबाद जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. या प्रकल्पावर आजपर्यंत ४२४ कोटी ९० लाखांचा ‍निधी ६९ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला आहे,’’ अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. देसाई यांच्या हस्ते नक्षलग्रस्त भागात खडतर, कठीण, कर्तव्य बजावल्याने विशेष सेवा पदक व उत्कृष्ट सेवा केलेले पोलिस आयुक्त कार्यालयाचे अधिकारी, अंमलदारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

देसाई म्हणाले, ‘‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात कांदा चाळ, संरक्षित शेती, शेततळे अस्तरीकरण, अहल्यादेवी रोपवाटिका, मनुष्यबळ विकास कार्यक्रम आदींसाठी तीन कोटींहून अधिक अनुदान वितरित केले आहे. शेतकऱ्यांचा विचार करून शासनाने मोफत सात-बारा देण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्ह्यात ८ लाख ३ हजार ६४४ सातबाराचे मोफत वाटप करण्यात आले. ज्याची टक्केवारी ९२ टक्के आहे. तर, ९८ टक्के सातबाऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. जिल्ह्याने इको बटालियनच्या सहकार्याने जिल्ह्याचे हरितक्षेत्र वाढविण्यावर भर दिला.’’ 

‘‘खरीप, रब्बीसाठी एक हजार ६१६ कोटी रुपये कर्ज वाटपाचा लक्ष्यांक होता. त्यापैकी दोन लाख १९ हजार २५५ शेतकऱ्यांना एक हजार २७२ कोटींचे कर्जवाटप केले. जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार ९८४ शेतकऱ्यांना  ९८२ कोटी रुपयांचा महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून लाभ दिला. कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०नुसार जिल्ह्यात ५४ कोटींचा निधी जमा झाला आहे. त्यापैकी १७ कोटी रुपये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळतील. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील ५ लाख ९३ हजार ६६५ शेतकऱ्यांना ३७८ कोटी ६७ लाखांहून अधिक रकमेचे अनुदान देण्यात आले. ‘विकेल ते पिकेल’अंतर्गत ओवा पिकाची जिल्ह्यात २१५ एकरांवर लागवड झाली.’’  

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी शासनाने पाच लाखांची मदत जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील २७ बालकांपैकी २० बालकांना मदत दिली. मतदार नोंदणीच्या कामात जिल्हा राज्यात २९ व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आला आहे. शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांना साडेतीन कोटी, घरेलू कामगारांना ३६ लाख असे एकूण चार कोटी रुपये दिले. 

खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित्त गोयल, लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.