औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज

औरंगाबाद : सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा १०-१५ टक्के वाढ होईल. कापूस पिकात घट होईल, असा अंदाज आहे. मका सरासरी इतकी राहील. तर तूर पिकाच्या क्षेत्रात १५-२० टक्के वाढीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
 In Aurangabad, Jalna and Beed districts, soybean and tur are expected to grow
In Aurangabad, Jalna and Beed districts, soybean and tur are expected to grow

औरंगाबाद : सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा १०-१५ टक्के वाढ होईल. कापूस पिकात घट होईल, असा अंदाज आहे. मका सरासरी इतकी राहील. तर तूर पिकाच्या क्षेत्रात १५-२० टक्के वाढीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित क्षेत्रापैकी सोयाबीनच्या क्षेत्रासाठी ३ लाख १९ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. त्यापैकी  शेतकऱ्यांकडे असलेले २८९७०१ क्विंटल, महाबीजकडून १४२८२ क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडून १ लाख १४ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध होईल, असे कृषी विभागाचे नियोजन आहे. 

तीनही जिल्ह्यांतील सरासरी प्रमुख पीकनिहाय क्षेत्रानुसार औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र ४ लाख १ हजार ३११ हेक्टर, जालन्यात २ लाख ५८ हजार १४ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार १६९ हेक्टर इतके आहे. सोयाबीनचे औरंगाबाद जिल्ह्यात १२३२३ हेक्टर, जालना जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ६४ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात २ लाख ५० हजार ३२७ हेक्‍टर इतके आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र १९०८८३, जालना ५२१४६, बीड ९८१५, तर तुरीचे औरंगाबाद जिल्ह्यात २९४२२, जालना ५०६९७, बीडमध्ये ५३१७२ हेक्टर इतके आहे. 

  औरंगाबादमध्ये सोयाबीनचे १३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र नियोजित

सोयाबीनचे औरंगाबाद जिल्ह्यात १३३०० हेक्टर, जालना १ लाख ४५ हजार ३०० हेक्टर, तर बीड जिल्ह्यात २ लाख ९० हजार हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित आहे. तुरीचे औरंगाबाद जिल्ह्यात ३५ हजार १०१ हेक्टर, जालना ६०५० हेक्टर, तर बीड जिल्ह्यात ८१ हजार हेक्टर, मक्याचे औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ७९ हजार हेक्टर, जालना ४८ हजार ९४० हेक्टर, तर बीड जिल्ह्यात १० हजार हेक्टरवर पेरणी नियोजित आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com