थंडीमुळे खानदेशात केळीला फटका;मदतीची मागणी

खानदेशात सर्वत्र केळीच्या एक ते दीड महिन्याच्या बागांपासून ते निसवणीच्या बागांचे नुकसान झालेले दिसत आहे. चोपडा, रावेर, जळगावमध्ये तापी काठानजीक मोठे नुकसान दिसत असून, ३० ते ३५ टक्क्यांनी उत्पादन घटेल, असे मला वाटते. हे लक्षात घेऊन शासनाने मदत जाहीर करावी. - संजय चौधरी, खेडी खुर्द, जि. जळगाव.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव  ः खानदेशात मागील महिन्यात कडाक्‍याच्या थंडीने केळी पिकाला फटका बसला असून, नवीन लागवडीचे कांदेबाग व निसवणीच्या अवस्थेतील बागांमध्ये ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. सर्वच ठिकाणी हे नुकसान झाले असून, केळी उत्पादकांना मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

केळीचे आगार असलेल्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, जळगाव, भडगाव, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागांत केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले.

निसवणीवरील बागांमध्ये घड अटकण्याची समस्या वाढली. एक ते तीन महिन्यांच्या बागांमध्ये अनेक झाडांची पाने पिवळी, लालसर होऊन करपल्यागत झाली आहेत. ही झाडे १०० टक्के वाया गेली आहेत. यामुळे अशा बागांमध्ये पिकात तूट वाढली आहे. झाडे कमी वजनाची येतील. कारण अनेक ठिकाणी केळीची लांबी हवी तशी नाही. घड आखूड आहेत.

याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असून, नुकसानीची पातळी पुढेही वाढेल. कारण कमी दर्जाच्या केळीला व्यापारी कमी दर देतील, अडवणूक करतील. उतीसंवर्धित रोपांच्या केळीला एकरी किमान ७० हजार रुपये खर्च लागतो. तर कंदांच्या केळीलाही एकरी किमान ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. हा खर्च लक्षात घेऊन शासनाने मदत जाहीर करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण, केळी पीकविम्यासंबंधी मागील वर्षाचाच घोळ मिटलेला नाही. रावेरातील २५०० शेतकरी पीकविम्याच्या परताव्यासाठी चकरा मारीत आहेत. विमा कंपनी दाद देत नाही, अशी स्थिती आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com