अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘केव्हीके’कडे तांत्रिक जबाबदारी

पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेत ‘राज्यस्तरीय तांत्रिक संस्था’ म्हणून बारामती कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) निवड करण्यात आली आहे.
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘केव्हीके’कडे तांत्रिक जबाबदारी
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘केव्हीके’कडे तांत्रिक जबाबदारी

पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेत ‘राज्यस्तरीय तांत्रिक संस्था’ म्हणून बारामती कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) निवड करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेतून (पीएमएफएमइ) राज्यातील २० हजार उद्योगांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. ही योजना केंद्राची असली तरी त्याची अंमलबजावणी राज्याच्या कृषी खात्याकडून केली जात आहे. योजनेसाठी ‘राज्यस्तरीय तांत्रिक संस्था’ निश्चित करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. निवडीबाबत अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात उत्सुकता  होती.  आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुरू होणाऱ्या या उन्नयन योजनेच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या कृषी आयुक्त धीरज कुमार काम पाहत आहेत. त्यांना कृषी खात्याचे सहसचिव अशोक अत्राम यांनी तांत्रिक संस्थेच्या निवडीबाबत अंतिम निर्णय कळविला आहे. बारामती  कृषी विज्ञान केंद्राला या कामासाठी परभणी येथील अन्न प्रक्रिया महाविद्यालय तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने योग्य ती मदत करावी, अशा सूचना देखील शासनाने दिल्या आहेत.  या योजनेतून राज्यातील  सुक्ष्म उद्योगाला प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्क्यांपर्यंत किंवा दहा लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सदस्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  बहुतांश समित्यांकडून पिके निश्‍चित या उन्नयन योजनेत केंद्र सरकारने जिल्हास्तरीय समिती स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बहुतेक समित्यांनी पिके निश्चित केली आहेत. कृषी आयुक्तालयाने आधी निश्चित केलेल्या पिकांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. नवी यादी आता राज्याच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com