बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवर

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, बाजार समितीला लागणाऱ्या एकूण विजेच्या ७० टक्के गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे.
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवर
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवर

सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, बाजार समितीला लागणाऱ्या एकूण विजेच्या ७० टक्के गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. त्यामुळे विजेच्या बचतीसह खर्चातही बचत करणारा हा प्रकल्प राबविणारी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.   सभापती राऊत, श्री. मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे पूजन करून तो कार्यान्वित करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती महावितरणकडून वीज घेऊन बाजार समिती आवारातील गाळेधारकांना पुरवठा करते. बाजार समितीचे कार्यालय व आवारातील गाळेधारक यांचे मिळून दरमहा साधारणत: तीन ते चार लाख रुपये वीजबिल येत होते. बाजार समितीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यामुळे आता हे बिल वाचणार आहे.

या प्रकल्पातून रोज सुमारे ३८४ युनिट अशी महिन्याला ११५२० युनिट वीज तयार होईल. यातून बाजार समितीचे कार्यालय, स्ट्रीट लाइट, जनावर बाजार, फळेभाजीपाला मार्केट व आवारातील गाळेधारक यांना वीजपुरवठा होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com