काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात

काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात

काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन काढणीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. परंतु उत्पादकता, उत्पन्नाच्या तुलनेत काढणीवरच जास्त खर्च होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.  कापसासोबतच परिसरात सोयाबीनची लागवड होते. लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यानंतर मात्र पावसाने जोरदार कमबॅंक केले. दमदार पाऊस सोयाबीनला पोषक ठरल्याने सोयाबीनची चांगली वाढ झाली. त्यामुळेच या हंगामात सोयाबीन पीक चांगले पैसे देऊन जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. परंतु, एकूण उत्पादकता खर्च आणि उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचा खर्च जुळता जुळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केल्यानंतर मळणीअंती एकरी २ ते ५ पोती इतकीच उत्पादकता मिळत असल्याची स्थिती आहे. परिणामी, पिकावर केलेल्या खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याचे चित्र आहे.  खरिपात सोयाबीनच्या विविध वाणांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यातील काही वाण कमी जास्त फरकाने काढणीला लवकरच येणार आहे. मात्र, काढणीला येणाऱ्या लवकर वाणांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे शेतकरी सांगतात. सोयाबीन कापणीला एकरी २००० रुपये मजुरांना द्यावे लागत असून मळणीचा खर्च प्रती पोते २०० रुपये आहे. त्याप्रमाणे सोयाबीनला तीन हजाराच्या आत भाव असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com