‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत ः डॉ. पवार

मधमाशी पालन आणि मध अभियान योजनेंतर्गत मध क्लस्टरची निर्मिती करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
The best help for the formation of 'honey cluster': Dr. Pawar
The best help for the formation of 'honey cluster': Dr. Pawar

नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन असून त्यामुळे कृषी उत्पन्नातही वाढ होऊ शकते. या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मध क्रांतीची हाक दिली आहे. मधमाशी पालन आणि मध अभियान योजनेंतर्गत मध क्लस्टरची निर्मिती करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.  

महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २१ ते २७ जानेवारी दरम्यान मधमाशी पालनावर ७ दिवसीय शास्त्रीय मधमाशी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गिरणारे (ता. नाशिक) येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. 

डॉ. पवार म्हणाल्या, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मधमाशी पालन, मध अभियान आणि एफपीओ योजनेंतर्गत मध क्लस्टर्सची निर्मिती यासारख्या योजनांद्वारे सर्वतोपरी मदत केली जाईल. ग्राहकांना चांगल्या दर्जाचे मधही उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना मधमाशीपालन हा उपजीविका म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. 

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे पश्चिम विभाग प्रादेशिक प्रमुख ए.  हातेकर म्हणाले की, नाशिक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, हवामान मधमाशी पालनासाठी अतिशय अनुकूल आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळातर्फे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही असे कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षण सत्रात सुप्रकृती मधुशाळा नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम यांचे मार्गदर्शन होत आहे. तांत्रिक सत्रात मधमाशीपालनाच्या माध्यमातून शेती उत्पन्न वाढ आणि जैवविविधता संवर्धनामध्ये शेतकऱ्यांचे योगदान आहे. 

गावपातळीवर पर्यावरणपूरक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मधमाशी पालनाच्या संधीबद्दल सखोल माहिती देण्यात येत आहे. याप्रसंगी ओमप्रकाश शेटे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या प्रीतम आढाव, गोदा कश्यपी फार्म प्रोड्युसरचे अध्यक्ष नितीन गायकर, ऋषिकेश कुमार, संदीप धीमान, एन. डी. गावित, डाॅ. प्रशांत भदाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसूत्रसंचालन प्राजक्ता भागवत यांनी केले. तर नितीन गायकर यांनी आभार मानले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com