टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे समितीच्या शिफारस

टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे समितीच्या शिफारस
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे समितीच्या शिफारस

पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला न वळवण्याची शिफारस करणारा अहवाल भावे समितीने दिला आहे. ‘‘हा अहवाल चुकीचा असून आता खरा अहवाल आम्ही शासनासमोर ठेवू,’’ असे टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी घोषित केले आहे.  जलसंपदा विभागाने भावे समितीच्या अहवालाबाबत अद्याप काही भाष्य केलेले नाही. मात्र, वाहून जाणारे पाणी कसे वापरता येईल याबाबत पुन्हा एक समिती नेमली आहे. “टाटाच्या ताब्यात असलेल्या सहा व कोयना धरणाचे पाणी उपयोगात आणले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा-कोयनेचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र, भावे समितीने मध्येच चुकीचा, तकलादू आणि एकांगी अहवाल सादर केला. तो सरकारी धोरणाच्या विसंगत आहे,” असे कदम यांनी नमूद केले.  या धरणांचे पाणी कृष्णा, भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून कदम यांनी लावून धरली आहे. त्यांनी किसान आर्मी व वॉटर आर्मीची स्थापना करून आंदोलनेही केली. सरकारने यानंतर हालचाली करीत जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे  यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट तयार केला होता. पाणी वळविले तर इतर राज्येही या पाण्यावर हक्क सांगतील, असे भावे समितीचे म्हणणे आहे.   “मुळात भावे समितीने परस्पर बैठका घेतल्या. जनतेला त्यात सहभागी करून घेतले नाही. आमच्या आंदोलनानंतर समितीने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून घेतला. त्यानंतर पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवू नये असा ढोंगी अहवाल सादर केला,” असे कदम यांचे म्हणणे आहे.  भावे समितीने कोणत्या बाबी वगळल्या पश्चिमेकडून पाणी पूर्वेकडे वळवण्याची गरज, त्यानंतर होणारे परिणाम, पर्यावरणाची स्थिती, पाणी वळवल्यानंतर होणारा तुलनात्मक फायदा, धरणालगतच्या गावांना पाणी मिळत नसल्याबद्दलची भूमिका, विद्युत कायदा २००३ आणि त्याची मूलतत्त्वे, या उपक्रमासाठी जल तंत्रज्ञान व विविध पर्याय, दीर्घकालीन नियोजन अशा बाबी समितीने अभ्यासातून वगळल्या, असेही कदम यांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com