नांदूर मध्यमेश्‍वरला १९पासून पक्षी संमेलन

पक्षी प्रदर्शन
पक्षी प्रदर्शन

नाशिक : नांदूर मध्यमेश्‍वरमध्ये १९ ते २१ जानेवारीदरम्यान तीन दिवसांचे पक्षी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात जगभरातून येणाऱ्या फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यांसारख्या देशी-विदेशी पक्ष्यांची माहिती मिळणार आहे. तसेच विविध चर्चासत्र व गाइड बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.   दरवर्षी परदेशांतून व विविध राज्यांतून २४२ प्रकारचे पक्षी या अभयारण्यात येतात. काही पक्षी ५० हजार किलोमीटरहून अधिक लांबचा प्रवास करून येथे येतात. त्यांचा प्रवासही येथे उलगडून दाखवला जाणार आहे. नांदूर मध्यमेश्‍वर बंधारा व परिसरात दरवर्षी हिवाळा सुरू होताच परदेशी व स्वदेशी पक्ष्यांचे संमलन भरते. या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, १९, २० व २१ जानेवारीला सकाळी ६ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. देशभरातील पक्षिप्रेमींना या स्थळांची माहिती व्हावी, यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचा प्रारंभ केला जाणार असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.  प्रतिक्रिया नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पक्षी स्थळांमध्ये व्हावे यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. रामसा ही इराणमधील आंतरराष्ट्रीय संस्था असून, त्यांच्याकडे ही शिफारस केंद्र सरकारने केली आहे. देशभरातील २६ साइट्सला असा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो या अभयारण्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पक्षी अभयारण्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी याचे आयोजन केले असून, त्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. - एन. आर. प्रवीण, वनरक्षक (वन्यजीव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com