‘बर्ड फ्लू’च्या अफवांनीच अधिक फटका 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या अफवांमुळे जिल्ह्यातील बॉयलर उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. बॉयलरचे दर तब्बल ४० ते ४२ रुपयांनी घसरल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत.
‘बर्ड फ्लू’च्या अफवांनीच अधिक फटका 
‘बर्ड फ्लू’बाबतच्या अफवांचा कुक्कुटपालन व्यवसायाला फटका Bird flu rumors hit poultry business

अकोला : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या अफवांमुळे जिल्ह्यातील बॉयलर उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. बॉयलरचे दर तब्बल ४० ते ४२ रुपयांनी घसरल्याचे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कुठलाही संसर्ग अद्याप समोर आलेला नाही. राज्यातील इतर ठिकाणच्या अफवा जिल्ह्यात पसरविल्या जात आहेत. अशा स्थितीत अफवांचा सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योजकांना बसत आहे . काही दिवसांपूर्वी ९० ते ९२ रुपये किलोचा असलेला दर आता थेट ५० ते ५२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चिक्स (लहान पिल्ले) २० रुपयांपर्यंत मिळत आहे. काही उत्पादकांनी या पूर्वी तब्बल ५३ रुपये दराने पक्षी आणून बॅच टाकलेली आहे. एक पक्षी तयार करण्यासाठी ८५ रुपयांपर्यंत खर्च केलेला आहे. अशा स्थितीत आता अवघे ५० रुपये दराने मागणी होत असल्याने लावलेला खर्च तर सोडाच तब्बल ४० रुपयांपर्यंत किलोमागे तोटा सहन करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे कुक्कुट पालकांनी सांगितले. 

प्रतिक्रिया आधीच कोरोनाच्या फटक्यातून थोडे सावरत असताना आता बर्ड फ्लूच्या अफवांचा फटका बसत आहे. प्रशासनाने नवीन बॅच टाकण्याबाबत पुढील आदेशापर्यंत थांबण्याची सूचना केली आहे. परंतु आम्ही जो खर्च करून सेटअप उभा केला, त्यासाठी मदतीबाबत, या पूरक उद्योगाला पाठबळ देण्याविषयी कोणी बोलत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.  -निलेश झोंबाडे, कुक्कुटपालक, अकोला 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.