ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत विचारमंथन

राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त कामे करणे, ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलमात सुधारणा करणे तसेच कामकाजाचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीची पहिली बैठक हवेली पंचायत समितीत झाली.
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत विचारमंथन
Brainstorming about extra work without Gramsevaks

अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त कामे करणे, ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलमात सुधारणा करणे तसेच कामकाजाचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीची पहिली बैठक हवेली पंचायत समितीत झाली. या वेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, समितीचे सदस्य प्रशांत जामोदे यांनी बैठकीत सहभागी होऊन सूचना मांडल्या.

बैठकीला राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान तथा समितीचे अध्यक्ष श्री. भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्री. ढाकणे व जामोदे यांनी ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामाबाबत माहिती दिली. शासनाने नेमलेल्या समितीचे कामकाज लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

ग्रामविकास विभागाची असंख्य कामे ग्रामसेवकांकडे आहेत. त्याची विषय सूची सादर केली. त्यामुळे इतर विभागाचे असणारी अतिरिक्त कामे तत्काळ कमी होणे या समितीमार्फत खूप गरजेचे आहे, अशी मागणी केली. तसेच ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ४९ रद्द होऊन त्यामध्ये नव्याने सुधारणा होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मध्ये कालबाह्य कायदे झालेले आहेत. त्यामध्ये सुधारणा व्हावी, आदी मुद्दे मांडले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com