तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे.
Bring oilseeds and edible oil
Bring oilseeds and edible oil

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाने यांत्रिकीकरणाद्वारे शेतकरी, ग्राहकांसाठी ‘स्वतःचे तेलबिया घेऊन या अन् गाळप केलेले खाद्यतेल नाममात्र दरात घेऊन जा’ अशा उपक्रमास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करून ग्रामीण भागातील विकास सोसायट्या, शेतकरी महिला गटांनी पुढाकार घेऊन छोटे प्रकल्प उभारल्यास खाद्यतेलात खेडी स्वयंपूर्ण होण्यास मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.

पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर म्हणाले, की गुजरातहून तेलबियांच्या गाळपाची सुमारे दीड लाख रुपये किमतीची मशिन कृषी महाविद्यालयाने खरेदी केलेली आहे. आठ तासांत सुमारे पन्नास किलो तेलबियांचे गाळप करण्याची क्षमता असलेले हे मशिन आहे. खाद्यतेलांच्या खरेदीमध्ये भेसळ नसलेल्या शुद्ध तेलाचा आग्रह ग्राहकांचा राहतो. त्यामुळे शेतकरी, ग्राहकांनी स्वतःच तेलबिया या ठिकाणी आणून समक्ष खाद्यतेल घेऊन जाण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. विकतचे खाद्यतेल खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या तेलबिया गाळपातून तेलाची उपलब्धता वाढविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा छोटासा प्रकल्प आहे.

कोणत्या तेलबियांचे होणार गाळप शुद्ध खाद्यतेलांची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, मोहरी आदी तेलबियांचे गाळप या ठिकाणी होईल. ग्राहकांना तेलबियांच्या गाळपातून खाद्यतेल आणि पेंड घेऊन गेल्यास प्रति किलो तीस रुपये शुल्क आकारणी होईल. तर केवळ तयार खाद्यतेल नेल्यास १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अर्थशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी दिली.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com