लॉकडाऊनच्या अस्थिरतेचा फायदा घेत बीटी तस्कर सक्रीय 

लॉकडाऊनमुळे निर्माण अस्थिरतेचा फायदा घेत एचटी बीटी तस्करांनी आपल्या हालचालींना वेग दिला आहे.
cotton seed
cotton seed

नागपूर ः लॉकडाऊनमुळे निर्माण अस्थिरतेचा फायदा घेत एचटी बीटी तस्करांनी आपल्या हालचालींना वेग दिला आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल कोट्यावधी रुपयांच्या बियाण्यांची आयात तस्करांनी केल्याची शक्‍यता असून यातील तब्बल ३७ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात नागपूर गुणनियंत्रण विभागाला यश आले आहे. कापसाचे सर्वाधीक लागवड क्षेत्र असलेल्या अमरावती विभागात मात्र गुणनियंत्रण शाखेला एक पाकिटही जप्त करता आले नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.  दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला तेलंगणा, आंधप्रदेश, गुजरातच्या सिमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनधिकृतरित्या तणाला प्रतिकारक बिटी बियाण्यांचा पुरवठा होतो. यालाच चोरबिटी असे देखील स्थानिक भाषेत म्हटले जाते. अमरावती विभाग व त्यानंतर नागपूर विभागातही नजीकच्या काळात कापसाखालील लागवड क्षेत्र वाढते आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी धान उत्पादक गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयात यावर्षी कापूस लागवड वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. कापूस क्षेत्र वाढते असल्याने याचा फायदा बिटी तस्कारांनी घेत अनधिकृत बियाणे पुरविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.  अमरावती विभागात यापूर्वी एक कोटी रुपयांचा एचटी बीटी (हर्बीसाईड टॉलरंट) बियाणे साठा जप्त करण्यात आला होता. खरिप हंगामाला अवघे १५ ते २० दिवस उरले असताना बिटी तस्कर पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्याची दखल घेत नागपूरचा गुणनियंत्रण विभागही सक्रीय झाला असून आठवडाभरात तब्बल ३७ लाख रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले. तंत्र अधिकारी एस.जे. पवार, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी एम.बी. केचे यांच्याव्दारे बिटी तस्करीची पाळेमुळे खोदली जात आहेत.  अशी झाली कारवाई बिटी पाकिटे (चौकटीत एकूण रक्‍कम)  मुल (चंद्रपूर) ः ३५०० पाकिटे (२५,५५,००० रुपये)  परसोडी (नागपूर) ः २.५२ किलो (४,०५,००० रु.)  भिवापूर (नागपूर) ः ६४ पाकिटे (५१२०० रु.)  मौदा (नागपूर) ः ४ पाकिटे (२९२० रु.)  आष्टी (चंद्रपूर) ः ३९ पाकिटे (२८४७० रु.)  केळवद (नागपूर) ः १००० पाकिटे (७,३०,००० रु.)  गोंडपिंपरी (चंद्रपूर) ः ३९ पाकिटे (२८४७० रु.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com