दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा जिल्हयात काँग्रेस, प्रहारला बहुमत

जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले असून, मोताळा येथे काँग्रेस, तर संग्रामपूरमध्ये प्रहार संघटनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा जिल्हयात काँग्रेस, प्रहारला बहुमत
In Buldana district, Congress won a majority in two Nagar Panchayat elections

बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले असून, मोताळा येथे काँग्रेस, तर संग्रामपूरमध्ये प्रहार संघटनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित आघाडीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. प्रामुख्याने भाजपला मोठा फटका मानला जात आहे.  मोताळा नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी बुधवारी (ता.१९) तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यात काँग्रेसने १२ जागांवर विजय संपादन करीत एक हाती सत्ता मिळवली आहे. शिवसेना चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.  मोताळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली. येथील १७ जागांसाठी ६४ उमेदवारांनी राजकीय भाग्य अजमावले. यात काँग्रेस १७, शिवसेना १७, राष्ट्रवादी काँग्रेस १२, वंचित बहुजन आघाडी ७, भाजप ६, अपक्ष ५ उमेदवारांचा समावेश आहे. मतमोजणीत एकूण १७ जागांपैकी काँग्रेसला १२ जागी दणदणीत विजय मिळाला. 

संग्रामपूरमध्ये बच्च कडूंचा ‘प्रहार’  जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीचा धक्कादायक निकाल आला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारप्रणीत उमेदवारांनी १२ जागांवर विजय मिळवत सत्ता आपल्याकडे खेचून आणली आहे. संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला. मात्र त्यांनी माजी मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. संजय कुटे यांच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली. प्रहारचे १२ उमेदवार विजयी झाले. काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाआघाडीला पाच जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला येथे खातेही उघडता आले नाही.    

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.