बुलडाणा ज्वारी लागवडीत विभागात अग्रेसर

पश्‍चिम विदर्भात रब्बी हंगाम म्हटला, की प्रामुख्याने हरभरा आणि गहू ही दोन पिके डोळ्यांसमोर येतात. परंतु दुर्लक्षित झालेले ज्वारीचे पीकही बुलडाणा जिल्ह्यात वाढत आहे. रब्बीत सुमारे १० हजार हेक्टरपर्यंत लागवड झाल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा ज्वारी लागवडीत विभागात अग्रेसर Buldana is a leader in sorghum cultivation
बुलडाणा ज्वारी लागवडीत विभागात अग्रेसर Buldana is a leader in sorghum cultivation

बुलडाणा : पश्‍चिम विदर्भात रब्बी हंगाम म्हटला, की प्रामुख्याने हरभरा आणि गहू ही दोन पिके डोळ्यांसमोर येतात. परंतु दुर्लक्षित झालेले ज्वारीचे पीकही बुलडाणा जिल्ह्यात वाढत आहे. रब्बीत सुमारे १० हजार हेक्टरपर्यंत लागवड झाल्याचे दिसून येत आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत बुलडाणा ज्वारी उत्पादनात अग्रेसर बनलेला आहे. जिल्ह्यात रब्‍बीत सर्वाधिक हरभऱ्याची व त्यानंतर गव्हाची लागवड होते. तिसरे प्रमुख पीक म्हणून रब्बी ज्वारीने आपले स्थान बळकट केले आहे. जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र १३ हजार ७०० हेक्टर आहे. यंदा लागवड ९२०० हेक्टरपर्यंत झाली आहे. तर विभागातील संपूर्ण पाचही जिल्हे मिळून ही लागवड ११ हजार ५०० हेक्टरपर्यंत पोचली. यावरूनच बुलडाणा जिल्ह्यातील ज्वारी लागवडीचा अंदाज येतो. विभागात अकोल्यात केवळ ४५३ हेक्टर, तर वाशीममध्ये ६८१ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात ६२८० आणि यवतमाळमध्ये ११११ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने घाटावरील तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीची (शाळू) लागवड केली जाते. दैनंदिन आहारात ज्वारीचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. बाजारात गव्हापेक्षा शाळूला अधिक दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांची ज्वारी लागवडीकडे पसंती टिकून आहे. रब्बी ज्वारीचे पीक हे पैसा मिळवून तर देतेच शिवाय जनावरांसाठी चाऱ्याची सुद्धा सुविधा होत असल्याने शेतकरी लागवड करीत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील रब्बी पिकांची लागवड

  • पीक    क्षेत्र
  • हरभरा    १४७२८५
  • गहू    ४५६९६
  • मका    ६८३२
  • रब्बी ज्वारी    ९२००  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com