‘रानमोडी’ विदेशी तणाच्या निर्मूलनाची मोहीम राबवा`

कोल्हापूर : हत्ती , गवे, रानडुक्कर आदी वन्य प्राणी नागरी वस्त्यांमध्ये येऊन मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. तो टाळण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाय व लोकसहभागातून विविध प्रयत्न करण्याची गरज आहे.
Carry out ‘Ranmodi’ exotic weed eradication campaign
Carry out ‘Ranmodi’ exotic weed eradication campaign

कोल्हापूर :  हत्ती , गवे, रानडुक्कर आदी वन्य प्राणी नागरी वस्त्यांमध्ये येऊन मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. तो टाळण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाय व लोकसहभागातून विविध प्रयत्न करण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्हा हा रानमोडी या तणामूळे व्यापला आहे. त्याचे उच्चाटन करण्याची मोहीम शासनाने प्राधान्याने राबवावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांनी वनमंत्री, पर्यावरण मंत्री,  कृषिमंत्री व सचिव यासह मुख्यप्रधान वनसंरक्षकांकडे केली. 

वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, अनिल चौगुले आदी तज्ज्ञांनी या बाबत आग्रही भूमिका मांडली आहे गेली दोन दशकांपेक्षा अधिक काळ वन्यजीव नागरी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. वन्यजीवांना आवश्यक असणारे अन्न ,पाणी, अधिवास आदी योग्य प्रकारे उपलब्ध न झाल्याने असे प्रश्न निर्माण होत आहेत. कारवीच्या चार जाती, दोन बांबू जाती, सहा जातीची झुडपे, वृक्षांच्या तेरा जाती, पाच जातींचे गवत हे प्राण्याचे अन्न आहे. अभयारण्य व जंगल परिसरात त्या पुरेशा असल्या तरी विदेशी रानमोडी तण वेगाने अतिक्रमण करीत आहे. त्याचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करणे गरजेचे आहे. जंगलाचे क्षेत्र आणि त्या तुलनेत उन्ह्याळ्यात उपलब्ध होणारे पाणीसाठे खूपच कमी आहेत. 

गव्यांना आवश्यक लोळी तयार करणे, क्षार पुरवणे, मानवी हस्तक्षेप टाळणे, आग व वणवे प्रतिबंधक कृती करणे, पाणीसाठे विकसित करणे, विस्थापित गावांच्या शेत जमीन व इतर पडजमिनीत आवश्यक स्थानिक खाद्य वनस्पतींची लागवड करणे, असे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. लोक व विद्यार्थी सहभाग घेऊन फूल व बी तयार होण्याआधी विदेशी रानमोडी सारख्या वनस्पती काढण्याची मोहीम घेणे गरजेचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com