कर कमी झाल्यामुळे काजू बीला दर मिळेल : बोवलेकर

काजूचा कर साडेबारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणल्यामुळे काजू बीला चांगला दर मिळण्याबरोबरच राज्यातील काजू उद्योगाला आर्थिक पाठबळ मिळेल.
cashew
cashew

सिंधुदुर्गनगरी ः काजूचा कर साडेबारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणल्यामुळे काजू बीला चांगला दर मिळण्याबरोबरच राज्यातील काजू उद्योगाला आर्थिक पाठबळ मिळेल, असे मत महाराष्ट्र कॅश्यु मॅन्युफॅक्चरर्स असोशियनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी येथे व्यक्त केले. असोसिएशनच्या कार्यालयात बोवलेकर यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी असोसिएशनचे सुधीर झांट्ये, बिपीन वरसकर, राजू बांदेकर, श्रीकृष्ण राणे, सिध्दार्थ झांट्ये, विश्वनाथ नांदोस्कर, पांडुरंग काणेकर, दयानंद काणेकर, परशुराम वारंग, अनंत कामत, राजू काणेकर आदी उपस्थित होते. बोवलेकर म्हणाले, की काजूवर साडेबारा टक्के कर आकारला जात होता. हा कर कमी करावा अशी संघटनेची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने काजुला चांगला दर मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केले. त्यामुळे साडेबारा टक्के असलेला कर आता पाच टक्क्यांवर आला आहे. याचा मोठा फायदा राज्यातील काजू व्यवसायाला होणार असून आर्थिक बळकटी मिळणार आहे. कर कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार राजेश पाटील यांनी प्रयत्न केल्यामुळे असोसिएशनच्या वतीने त्यांचा वाशी येथे सत्कार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हमीभाव आवश्‍यक काजू उद्योजकांनी केलेल्या मालाला मागणी वाढल्यामुळे नवउद्योजकांची संख्यादेखील वाढली. त्यामुळे काजू बी मागणीदेखील वाढली. सध्या देशात १९ लाख टन काजू बीची आवश्यकता असून, केवळ आठ लाख टन एवढेच उत्पादन होत आहे. काजूला गोव्याप्रमाणे हमीभाव मिळणे अपेक्षित आहे. काजू बोंडावर प्रकिया करून विविध उत्पादन करणे, चोथ्यापासून पाश्‍चिमात्य देशात बिस्किटे तयार होतात. त्याप्रमाणे उद्योग महाराष्ट्रात येणे गरजेचे आहे. प्रकिया उद्योगासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असून, या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास काजू उद्योगाला चालना मिळेल अशी अपेक्षा बोवलेकर यांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com