पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे

पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरच्या प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रथमच निवडून आलेले मुळशीचे सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे.
 As the chairman of Pune District Bank, Digambar Durgade
As the chairman of Pune District Bank, Digambar Durgade

पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरच्या प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रथमच निवडून आलेले मुळशीचे सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. 

शनिवारी (ता.१५) जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी ही निवड करण्यात आली आहे. मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी चर्चा करून प्रा. दुर्गाडे आणि चांदेरे यांची नावे अंतिम केल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, ‘‘सहकार कायद्यात आता केंद्र सरकारकडून बदल होत आहेत. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी एकमताने दुर्गाडे यांची निवड केली. बॅंकेचा कारभार उत्तम आणि पारदर्शक करण्याच्या सूचना नवीन संचालक मंडळाला करण्यात आल्या आहेत. कर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता झाली असल्यास कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नागरिक, सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना कर्ज सहज देण्याची बॅंकेची पंरपरा ते पार पाडतील.’’ 

प्रा. दुर्गाडे यांनी 'ड' वर्ग अन्य सहकारी संस्थांच्या मतदारसंघातून दादा पाटील-फराटे यांना पराभूत केले. फराटे यांचा अनुभवी दुर्गाडे यांच्याकडून तब्बल ६८४ मतांनी पराभव झाला होता. तर, चांदेरे यांनी मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत विजय मिळविला.  दरम्यान, अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष दौंडचे रमेश थोरात यांना पुन्हा संधी देण्यात येईल, असे अंदाज बांधले जात होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com