सप्तशृंग गडावर चैत्रोत्सव भाविकांविना साजरा

सप्तशृंगगडावर सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेला कीर्तिध्वज परंपरेनुसार सोमवारी (ता.२६) मध्यरात्री डौलात फडकला. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द आहेत. त्यामुळे भाविकांशिवाय चैत्रोत्सव व ध्वजारोहण सोहळा झाला.
Chaitrotsav celebrated without devotees at Saptashring fort
Chaitrotsav celebrated without devotees at Saptashring fort

वणी, ता. दिंडोरी : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेला कीर्तिध्वज परंपरेनुसार सोमवारी (ता.२६) मध्यरात्री डौलात फडकला. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द आहेत. त्यामुळे भाविकांशिवाय चैत्रोत्सव व ध्वजारोहण सोहळा झाला. समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ५६९ फूट उंचावर असलेल्या गडशिखरावर डौलात ध्वज फडकला.

कोरोनाचे संकट निवळून आदिमायेचे रूप व शिखरावर डौलात फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन लवकरच घ्यावे, यासाठी लाखो भाविकांनी घरूनच आदिमायेचे पूजन केले. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक उन्हातान्हाची तमा न बाळगता मजल-दरमजल करत गडावर   येतात. आदिमायेपुढे नतमस्तक झाल्यानंतर शिखरावर फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन माघारी परततात. मात्र,‘कोरोना’मुळे भाविकांना उपस्थित राहता आले नाही.

चैत्रोत्सव सोमवारी (ता.२६) सकाळी नऊला आदिमायेची नित्यनेमात पंचामृत महापूजा झाली. दुपारी साडेतीनला श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात कीर्तिध्वजाचे पूजन विश्वस्त मनज्योत पाटील, ललित निकम, भूषण तळेकर, सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ध्वजाचे मानकरी दरेगावचे एकनाथ गवळी, काशिनाथ गवळी आदींच्या हस्ते झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com