सातबारा संगणकीकरण काम फेब्रुवारीत पूर्ण करू ः पाटील

चंद्रकात पाटील
चंद्रकात पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्रात सातबारा संगणकीकरणाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्के काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून यात महाराष्ट्र प्रथम राज्य करू, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभेचे दुसरे अधिवेशन रविवारी (ता. २४) लोणार वसाहत येथील गणेश हॉलमध्ये झाले. या वेळी ते बोलत होते. तलाठ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी संपकाळातील अनुपस्थिती रजा समजून पगार देण्यात येईल, अपुऱ्या लॅपटॉपची पूर्तता करण्यात येईल. संगणकासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हरची गती वाढविण्याबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. बदल्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, अन्य मागण्यांबाबत आज चर्चा करा, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठराव करून सादर करा. पुणे जमावबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम म्हणाले, ७५ तालुक्यांतील २७ हजार ३१० गावांचे सातबारा संगणकीकरणाचे एकूण ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी संगणकाची गती वाढविण्यासाठी भारत संचार निगम यांच्याकडून पुरेसे प्रयत्न करण्यात येत आहेत.  या वेळी महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी सातबारा संगणकीकरण हा तलाठ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने शासनाच्या पुरेशा पायाभूत सुविधा नसतानाही तलाठी काम करत असून, त्यांचे विविध प्रश्न आणि समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com