नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या काही भागांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, बाधित क्षेत्रांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत केली आहे. सध्या बऱ्याच भागांत विविध पिकांची काढणी सुरू आहे. मात्र, राज्यात आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून, तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com