मुख्य सचिवांची `जायकवाडी`ला भेट

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी पैठण येथील प्रसिद्ध जायकवाडी धरणास शनिवारी (ता. १२) भेट दिली.
Jaykwadi dam
Jaykwadi dam

औरंगाबाद  : राज्याचे मुख्य सचिव  संजय कुमार यांनी पैठण येथील प्रसिद्ध जायकवाडी धरणास शनिवारी (ता. १२) भेट दिली. यावेळी त्यांनी धरणाच्या साठ्याविषयी व पुढील दोन वर्षाच्या संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी धरण कसे उपयोगी पडते याविषयीची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक एन. शिंदे यांच्याकडून जाणून घेतली.  यावेळी त्यांनी धरणाच्या साठ्यास विधीवत नारळ अर्पण केले. श्री. शिंदे यांनी पूरनियंत्रण करताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे नियमन करण्यासाठी वापरण्यास येणाऱ्या वायरलेस यंत्रणा कार्यवाहीची माहिती मुख्य सचिव यांना दिली. त्यानंतर मुख्य सचिव संजय कुमार व प्रसिद्ध वास्तुविशारद श्री. दास यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पैठण येथील विख्यात संत ज्ञानेश्वर उद्यानाची नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने पाहणी केली.  यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व राज्याचे जलपसंपदा सचिव नागेंद्र शिंदे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, मुख्य अभियंता (लाभक्षेत्र) दिलीप तवार उपस्थित होते. श्री. कुमार आणि श्री. दास यांनी उद्यानाची पाहणी केली.  यावेळी मुख्य सचिव म्हणाले, उद्यानाला वृक्षांच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात निसर्ग संपत्ती लाभली आहे. या संपत्तीचा उपयोग होणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच विकास आराखडा बनविणे आवश्यक आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्यानाचा विकास झाल्यास कशाप्रकारे पर्यटनाला चालना मिळेल याविषयी मार्गदर्शन केले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com