परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१ हजार शेतकऱ्यांचे दावे

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या ३१ हजार ७०८ शेतकऱ्यांनी विमा कंपनी तसेच कृषी विभागाकडे पूर्वसूचना करत पीकविमा परताव्यासाठी दावे केले आहेत.
Claims of 31 thousand farmers for crop insurance refund in Parbhani district
Claims of 31 thousand farmers for crop insurance refund in Parbhani district

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या ३१ हजार ७०८ शेतकऱ्यांनी विमा कंपनी तसेच कृषी विभागाकडे पूर्वसूचना करत पीकविमा परताव्यासाठी दावे केले आहेत. काढणी पश्चात नुकसानीच्या १ हजार ४४८ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना केल्या आहेत.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख १२९ विमा प्रस्ताव दाखल केले असून ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपये विमा हप्ता भरून ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टरवरील खरीप पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. त्यात ३ लाख १६ हजार ९६६ शेतकऱ्यांनी २ लाख ४० हजार ३३ हेक्टरवरील सोयाबीन, ५९ हजार ६८४ शेतकऱ्यांनी २३ हजार ६६७ हेक्टरवरील कपाशी, १ लाख २४ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ४५ हजार ८१४ हेक्टरवरील तूर, १ लाख १२ हजार ५८५ शेतकऱ्यांनी ३९ हजार ५७२ हेक्टरवरील मूग, ५१ हजार ४५७ शेतकऱ्यांनी १५ हजार १६९ हेक्टरवरील उडीद, २७ हजार ९१० शेतकऱ्यांनी ९ हजार ४०९ हेक्टरवरील ज्वारी,६ हजार ७०८ शेतकऱ्यांनी २ हजार ४१६ हेक्टरवरील बाजरी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र कमी  आहे.

स्थानिक आपत्तीअंतर्गत पीकविमा परताव्यासाठी ३१ हजार ७०८ पूर्वसूचना (दावे) प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार १०२ दावे अपात्र ठरले आहेत.एकूण ९ हजार १६ पू्र्वसूचनाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

काढणी पश्चात नुकसानीच्या १ हजार ४४८ पूर्वसूचना प्राप्त असून त्यात परभणी तालुक्यातील १८९, जिंतूर तालुक्यातील ७५६, सेलू तालुक्यातील  १९४, मानवत तालुक्यातील ५७, पाथरी तालुक्यातील ४६, सोनपेठ तालुक्यातील १५, गंगाखेड तालुक्यातील ५८, पालम तालुक्यातील ५६, पूर्णा तालुक्यातील ७७ पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व पूर्वसूचनांच्या पडताळणीचे  काम बाकी आहे  असे सूत्रांनी सांगितले.

स्थानिक आपत्ती अंतर्गत पूर्वसूचना स्थिती

तालुका एकूण पूर्वसूचना सर्वेक्षण संख्या
परभणी ३२८३ ९०५
जिंतूर ११६७० २९२४
सेलू २१५० ४२१
मानवत ७१२ १०९
पाथरी १२१२ २१६
सोनपेठ १००६ २५५
गंगाखेड ५२०१ १६९१
पालम ३०५४  १२१८
पूर्णा ३४२१ १२७७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com