वातावरण बदलाचा संत्रा बागांना तडाखा

या वर्षात कधी अतिवृष्टी तर कधी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने खरीप पिके हातातून गेली. रब्बीतही नुकसान झाले. सोबतच जिल्ह्यात केळी, संत्रा फळबागांनाही तडाखा बसला.
वातावरण बदलाचा संत्रा बागांना तडाखा
Climate change hits orange orchards

बोर्डी, जि. अकोला ः या वर्षात कधी अतिवृष्टी तर कधी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने खरीप पिके हातातून गेली. रब्बीतही नुकसान झाले. सोबतच जिल्ह्यात केळी, संत्रा फळबागांनाही तडाखा बसला. वातावरण बदलामुळे संत्रा बागांमध्ये फळांची गळती, अवेळी पिवळे होण्याची समस्या समोर आली आहे. यामुळे संत्रा उत्पादक चिंतातूर झालेले आहेत.  

पाऊस, ढगाळ वातावरण, किडींमुळे खरीप, रब्बीतील पिकांचे नुकसान झालेले आहे. आता गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. रब्बीतील प्रमुख लागवड असलेल्या हरभरा पिकावर कीड-रोग वाढलेले आहेत. हरभऱ्याची झाडे जागेवर सुकत आहेत. वन्य प्राण्यांचाही त्रास होत आहे. अकोट, तेल्हारा तालुक्यांत मोठ्या क्षेत्रावर असलेल्या केळी, संत्रा बागांनाही या परिस्थितीचा फटका बसलेला आहे. या वर्षी हवामान बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचा आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मृग बहराची फळे लहान असताना पिवळा होऊन गळाला. केळीवरसुद्धा करपा येऊन पाने पिवळी पडत आहेत.

यंदा कांदा, गहू, हरभरा ही पिके बुरशी रोगाच्या कचाट्यात सापडली आहेत. या नुकसानाची वेळीच दखल न घेतल्याने मागच्या वर्षीचा सुद्धा विमा भेटलेला नाही. यावर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने दखल घेऊन सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून आर्थिक मदत देण्यात यावी - अमोल तळोकार, शेतकरी, बोर्डी, जि. अकोला

पावसामुळे पिकावर आणि त्याच्या वाढीवर वाईट परिणाम झाल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रसार वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे  - रामदास राऊत, शेतकरी, बोर्डी, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.