पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद करा ः देशमुख

शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसतील तर संबंधित आडत व्यापाऱ्यांवर कारवाई करा. त्यांचे लिलाव बंद करा, असे आदेश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.
Close auction of money laundering traders: Deshmukh
Close auction of money laundering traders: Deshmukh

सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसतील तर संबंधित आडत व्यापाऱ्यांवर कारवाई करा. त्यांचे लिलाव बंद करा, असे आदेश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले.  

बाजार समितीच्या सभागृहात सभापती विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. या वेळी उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शेळके, प्रकाश वानकर, अमर पाटील, बसवराज इटकळे, वसंत पाटील, शिवानंद पुजारी, राजकुमार वाघमारे, सचिव चंद्रशेखर बिराजदार, उपसचिव दत्ता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

कांद्याच्या सहा आडत दुकानदारांनी ४० शेतकऱ्यांचे २० लाख रुपये थकवले आहेत. यापैकी ४ लाख दिले असून, अद्याप १६ लाख रुपये थकीत आहेत. काही आडत दुकानदारांनी धनादेश दिले. परंतु ते वटले नाहीत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यावर आमदार देशमुख यांनी प्रशासनालाच थेट सवाल करत शेतकऱ्यांची फसवणूक आडत दुकानदार करीत असतील तर अशांवर कारवाईसाठी कशाची वाट थांबता, त्यांचे लिलाव बंद करा आणि पुढील कायदेशीर कारवाई करा, असे आमदार देशमुख यांनी प्रशासनाला सुनावले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे देता आले नाहीत. पण रब्बी हंगामात खते व बियाणे देण्यात येणार असल्याचे सांगितले.

रस्त्यासाठी दहा कोटी रुपये बाजार समितीच्या आवारातील भुसार आवार, भाजीपाला आवार व इतर ठिकाणचे रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. येथे सिमेंटचे रस्ते करण्यासाठी आठ कोटी तर डांबरी रस्ते करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचा प्रस्ताव पणन संचालकाकडून मंजूर करून घेण्याचा निर्णय बैठकीत झाला.

५८ विषयांवर चर्चा शेतकऱ्यांसाठी एक रुपयाच्या जेवणाचे दर वाढवून देणे, डीसीसी बँकेच्या विविध शाखांत बाजार समितीच्या ८.७५ कोटींच्या ठेवी आहेत, त्याची मुदत संपली असून, ती रक्कम पुन्हा पुनर्गुंतवणूक करणे, नवीन परवान्यासाठी आलेल्या अर्जाचा विचार करणे, नवीन दुकान हस्तांतर करणे व मुदत वाढवून मिळणे, बाजार फी, देखरेख खर्च व विलंबाकाराचे आडत्यांनी दिलेले धनादेश बँकेतून वटले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यासह वेगवेगळ्या खर्चाला मंजुरी देण्याच्या ५८ विषयांस मंजुरी देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com