क्लस्टर फॅसिलिटेशन सेलमध्ये  मोसंबी पिकाचा समावेश 

राज्याच्या कृषी निर्यात धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या क्लस्टर फॅसिलिटेशन सेलमध्ये मोसंबी या फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे.
In the cluster facilitation cell Includes citrus crop
In the cluster facilitation cell Includes citrus crop

औरंगाबाद ः राज्याच्या कृषी निर्यात धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या क्लस्टर फॅसिलिटेशन सेलमध्ये मोसंबी या फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात आपण शासनस्तरावर वेळावेळी पाठपुरावा केल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. २२ डिसेंबर रोजी या बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हे चव्हाण यांच्या पाठपुराव्याचे यश मानले जात आहे.  राज्यात कृषी धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता राज्य शासनाने ६ सप्टेंबर २०२१ रोजी शासन निर्णयाव्दारे प्रत्येक पिकासाठी पिकनिहाय वीस क्लस्टरनिहाय क्लस्टर फॅसिलिटेशन सेल गठीत केले होते. या मध्ये केळी, डाळिंब, हापूस आंबा, संत्री, द्राक्षे, कांदा, काजू, फुले, भाजीपाला, बिगर बासमती तांदूळ, गुळ, मसाला-मिरची, दुग्धजन्य पदार्थ आदींचा समावेश होता. मात्र यामध्ये मोसंबी पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता. मराठवाड्यात विशेषत: औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मराठवाड्यातील मोसंबीची निर्यात झाल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होण्यास मदत होईल. त्यामुळे शेतीमाल निर्यातीच्या समुहामध्ये मोसंबी पिकाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सप्टरेंबर २०२१मध्ये केली होती. या संदर्भात शासनस्तरावर सतत पाठपुरावा देखील त्यांच्याकडून सुरू होता. अखेर शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २२ डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून यामध्ये मोसंबी क्लस्टर फॅसिलिटेशन सेल गठीत केला आहे. 

केसर आंबा क्लस्टरची व्याप्ती वाढली  औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड यासह नागपूर, अमरावती, वर्धा, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार केशर आंबा क्लस्टरमध्ये औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, जालना, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. मराठवाड्यात केशर आंब्यांची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तसेच केसर आंब्यासाठी भौगौलिक मानांकन मराठवाडा केसर आंबा म्हणून मिळालेले असल्याने मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांचाही केशर आंबा क्लस्टरमध्ये समावेश करावा, अशी मागणी आपण केली होती असेही चव्हाण यांनी सांगितले आहे. २२ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात केशर आंबा या पिकाच्या क्लस्टरमध्ये परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड या उर्वरित जिल्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला हे विशेष.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com