सहकारी दूध संघच शाश्‍वत - बाळासाहेब थोरात

‘‘ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारा दुग्ध व्यवसाय व सहकारी दूध संघ आपल्या प्रपंचाची निगडित असल्याने, कायम दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. शाश्‍वत स्वरूपाच्या सहकारी दूध संघांऐवजी खासगी दूध संघांच्या तात्पुरत्या आमिषाला दूध उत्पादकांनी बळी पडू नये,’’ असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
Co-operative Milk Union is eternal - Balasaheb Thorat
Co-operative Milk Union is eternal - Balasaheb Thorat

नगर ः ‘‘ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारा दुग्ध व्यवसाय व सहकारी दूध संघ आपल्या प्रपंचाची निगडित असल्याने, कायम दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. शाश्‍वत स्वरूपाच्या सहकारी दूध संघांऐवजी खासगी दूध संघांच्या तात्पुरत्या आमिषाला दूध उत्पादकांनी बळी पडू नये,’’ असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

संगमनेर तालुका सहकारी दूधउत्पादक संघ व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात राजहंस गोधन कर्जयोजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महानंद व राजहंसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते. या वेळी शेतकऱ्यांना कर्ज धनादेशांचे वितरण करण्यात आले. थोरात म्हणाले, की सहकारी दूध संघासारख्या आपल्या हक्काच्या संस्था जपल्या पाहिजेत. सध्या दूध पावडरचे भाव वाढले आहेत. खासगी संघचालक वाढीव दर देऊन दुधाचे संकलन करीत आहेत. मात्र ही तुमच्या जिवाभावाची संस्था असल्याची जाणीव ठेवा. दूध संघामुळेच खासगीवर नियंत्रण असते. देशमुख यांनी अडचणीच्या काळात राजहंस व महानंदमध्ये अत्यंत चांगले काम केल्याचे गौरवोद्‍गारही शेवटी त्यांनी काढले.  देशमुख म्हणाले, की स्टेट बँकेच्या सहकार्याने राजहंस दूध संघाच्या पुढाकारातून राजहंस गोधन कर्ज वितरण योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेमुळे गोधन वाढीस नक्कीच मदत होईल. कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला.  व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, विनोदकुमार, सुनीता नयनार, वैभव कदम, सुनील गुरूकर, राजेंद्र चकोर, वसंतराव देशमुख, सुनील कडलग, डॉ. गंगाधर चव्हाण आदींसह संचालक व तहसीलदार अमोल निकम, बापूसाहेब गिरी, संघाचे व्यवस्थापक गणपतराव शिंदे आदी उपस्थित होते. 

गोधन योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांचे कर्ज दूध उत्पादकांना मिळणार आहे. या योजनेतून ९५७ उत्पादकांनी कर्ज अर्ज केले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.  - रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, महानंद   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com