थंडीची लाट ओसरली

थंडीची लाट ओसरली
थंडीची लाट ओसरली

पुणे : नववर्षाच्या सुरवातीला राज्यात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. राज्यातील एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळपास पोचले आहे. पुणे, जळगाव, नगर, धुळे, नाशिक, नागपूर, परभणी या जिल्ह्यांत काही ठिकाणी तापमान १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद होत आहे. तर उर्वरित राज्यात तापमान १० अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविले आहे.  उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात गोठविणारी थंडी अनुभवायला मिळाली. निफाडमध्ये पारा हंगामातील नीचांकी १.८ अंशांपर्यंत घसरला होता. तर महाबळेश्वरसह राज्यात काही ठिकाणी दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. कडाक्याच्या थंडीमुळे पिकांनाही फटका बसला. मात्र गुरुवारपासून (ता. ३) उत्तरेकडील प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. शनिवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.२ अंश, धुळ्यातील कृषी महाविद्यालयात ७.६ अंश आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर येथे ८.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

दक्षिण चीन समुद्रातील ‘पाबक’ वादळ अंदमान-निकोबार बेटसमूहाकडे सरकत आहे. आज (ता. ६) सायंकाळीनंतर हे वादळ आंदमान बेटसमूहाला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ते म्यानमारकडे निघून जाताना त्याची तीव्रता कमी होणार आहे. अंदमान बेटांजवळ समुद्र खवळणार असून, उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

शनिवार (ता. ५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.१(१.७), नगर ८.१ (-३.०), जळगाव ९.६ (-२.३), कोल्हापूर १४.६(-०.१), महाबळेश्‍वर १४.५(१.७), मालेगाव ११.८ (१.६), नाशिक ९.४(०.०), सांगली ११.१(-३.०), सातारा १०.६ (-१.८), सोलापूर १६.५(०.९), सांताक्रुझ १५.२(-१.९), अलिबाग १६.९(-०.४), रत्नागिरी १६.४(-२.७), डहाणू १५.०(-२.१), आैरंगाबाद ११.०(-०.४), परभणी १२.९ (०.२), नांदेड १३.५(०.९), अकोला १४.४(०.७), अमरावती १३.०(-०.७), बुलडाणा १४.० (०.३), चंद्रपूर १४.२(१.१), गोंदिया १०.४(-२.४), नागपूर ८.६(०.५), वर्धा ११.९(-०.४), यवतमाळ १५.४(१.२).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com